पाठलाग करत तरुणाला भर रस्त्यात संपवले

0
198
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

नाशिक : दुचाकीवरून निघालेल्या तरुणाचा पाठलाग करत तिघांनी चॉपरने सपासप वार करुन निर्घृण हत्या केली. शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शहरातील नाशिक-पुणे महामार्गावरील बोधले नगरपरिसरात ही थरारक घटना घडली.

तुषार देवराम चौरे असे मृत युवकाचे नाव आहे. पूर्व वैमनस्यातून तुषारच्या ओळखीतल्या मित्रांनीच त्याची हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचनामा आणि गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

एखाद्या चित्रपटात शोभावा असा हा प्रसंग बोधले नगरच्या रस्त्यावर घडला. दुचाकीवरुन तीन संशयितांनी तुषारच्या दुचाकीचा पाठलाग केला. जवळपास एक ते दोन किलोमीटरचा पाठलाग करुन हल्ला चढवत तुषारला रक्तबंबाळ केले. काही मिनिटांत तुषारचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेली माहिती नुसार, तुषार चौरे हा तरुण बोधले नगर येथील एका दुकानात कामाला आहे. तो आणि त्याचा मित्र नाशिक-पुणे महामार्गावर बोधले नगर परिसरात दुचाकीने जात असताना पाठीमागून दुचाकीवर ट्रीपल सीट आलेल्या तीन संशयितांनी चौरेच्या दुचाकीला लाथ मारली. दुचाकीहून पडल्याने संशयितांनी धारधार शस्त्राने हल्ला केला, यात चौरे गंभीर जखमी झाला. दुचाकीवरील चौरेचा मित्र पळून गेल्याने वाचला. रात्रीची वेळ असल्याने संशयितांची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र तुषारच्या ओळखीतल्या मित्रांनीच त्याची हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here