पाण्यात 15 मिनिटं तोंड बुडवून निर्घुणपणे मारलं,तिचा गळा चिरुन धडापासून डोकं वेगळं

spot_img

पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे, पोलीस निरीक्षक ऋषिकेश वळ तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे राम सुरवसे, सुनील पवार, सागर चव्हाण, विष्णू वाघमेडे, जयंत पाटणकर, सुनील मालावकर, विनोद पाटील,मिलिंद घरत, शरद पाटील, विनायक कचरे आणि पथकाने चार पाच दिवसात या गुन्ह्याचा सोक्ष मोक्ष लावला.

मुंबई : वसईतील भुईगाव समुद्र किनाऱ्यावरील डोकं नसलेल्या मृतदेहा प्रकरणी आता खुलासा झाला आहे. सानियाच्या हत्ये प्रकरणी आता आणखी तीन जणांना अटक केली आहे. तर याआधी सानियाच्या पतीला पोलिसांनी अटक केली होती.
या हत्येत सानियाचा सासरा, दीर आणि मेव्हणा यांच्यासह संपूर्ण कुटुंब सहभागी आसल्याचं समोर आलं आहे. सानियाला या कुटुंबाने पाण्यात 15 मिनिटं तोंड बुडवून निर्घुणपणे मारलं आणि त्यानंतर तिचा गळा चिरुन धडापासून डोकं वेगळं केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.

सानिया शेख या 25 वर्षीय महिलेच्या हत्येचा तब्बल 13 महिन्यांनतर छडा लागला आहे. सानियाची हत्या संपूर्ण शेख कुटुंबाने अगदी निर्दयीपणे केल्याचं उघड झालं आहे. गळा कापून सानियाचं मुंडकं तिच्या शरीरापासून वेगळ केलं गेलं. हत्येच्या दिवशी सानिया आणि तिचा नवरा आसिफ शेख यांच्यात जोरदार भांडण झालं होतं. ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी बकरी ईद होती. ईदच्या दिवशी सानिया भांडण करते म्हणून तिला मारण्याचा प्लॅनच संपूर्ण कुटुंबानं मिळून तयार केला. सानियाचा पती आसिफने सानियाला बेडरूम मध्ये नेवून तिला जबर मारहाण केली. त्यानंत तिचे हात पाय बांधून ठवले. काही वेळाने तिचा गळा आवळा मात्र तरीही सानियाचा जीव जात नव्हता, त्यानंतर कुटुंबीयांनी सानियाचं तोंड पाण्याने भरलेल्या बादलीत 15 मिनिटं दाबून ठेवलं. सानिया तिचा जीव वाचवण्यासाठी तडफडत होती. मात्र तिच्या आवाजाची या निर्दयी आसिफ आणि कुटुंबियांना दया माया नव्हती. अखेर तडफडत तडफडत सानियाचा जीव गेला.

सानियाने जीव सोडल्यानंतर आसिफ आणि त्याचे वडिल हनीफ शेख या दोघांनी तिंचं डोकं कापायचं ठरवलं. आसिफनं घरातून मटन कापाण्याचा सुरा आणला आणि मटन कापावं तास तिचा गळा कापायला सुरुवात केली. मात्र आसिफला तिचा गळा कापता आला नाही. गळा कापता कापता आसिफला चक्कर येवू लागली. या नंतर आसिफच्या बापानं सुरा हातात घेतला आणि सानियाचं डोकं अवघ्या काही मिनिटातच शरीरापासून वेगळ केलं. एवढ्यावर हे थांबले नाहीत तर हे डोकं सानियाचं आहे याचा संशय कुणाला येवू नये म्हणून ट्रिमर मशिनच्या साह्याने तिच्या डोक्यावरचे केस कापले. या नंतर तिच्या ओठांवर एक काळ्या रंगाचा मोठा तीळ होता. चाकूच्या साह्याने तो देखील कापून टाकला. त्यानंतर एका पिशवीत सानियाचं डोकं पॅक केलं आणि स्वतःच्या दुचाकीने भावाबरोबर हायवे वरील खानिवडे येथील पुलावरून खाडीत फेकून दिलं आणि पुन्हा घरी आला. तो पर्यंत त्याचा मेव्हणा घरी आला होता. त्याच दिवशी आसिफ त्याचे वडील आणि मेव्हणा युसुफ या तिघांनी मिळून चादरीत सानियाचा मृतदेह गुंडाळला आणि एका ट्रॉली बॅगेत टाकला. त्यानंतर मृतदेह युसूफच्या ओला कारने खाडीत नेहून टाकला. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अंधारात हा सर्व कारनामा केला. मात्र उशिरा का होईना त्यांचा हा कारनामा पोलिसांनी उघडं केला. सध्या या चारही आरोपींना 22 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

वसई पोलिसांनी या प्रकरणात सानियाचा नवरा आसिफ शेख, सासरा हनीफ शेख, दीर याशिन शेख आणि मेव्हणा युसुफ शेख याला अटक केली आहे. वसई पोलिसांनी सध्या या चारही आरोपींना चार वेगवेगळ्या कस्टडीत ठेवलं आहे. या चारही आरोपींना पकडल्यावर त्यांनी हा गुन्हा केलाच नसल्याचं छातीठोकपणे पोलिसांना सांगितलं होतं. कारण सानियाचं मुंडक सापडत नव्हतं. त्यामुळे हा मृतदेह सानियाचा आहे याची ओळख पटवणं फार मोठ आव्हान पोलिसांसमोर होतं. याचाचा आधार आरोपी घेत होते. अखेर वसई पोलिसांनी सानिया, आसिफ आणि त्यांची चार वर्षाची मुलगी यांचा DNA रिपोर्ट काढल्यावर हा मृतदेह सानियाचाच आहे हे उघड झालं. आसिफने गुन्हा कबुल केला आहे. मात्र त्याच्या चेहऱ्यावर आजही पश्चाताप कुठेही दिसत नाही. सानियाचे अनैतिक संबध असल्याने मी तिला मारल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं आहे. हा गुन्हा उघडीकीस आणायला मागील 13 महिन्यात वसई पोलिसांनी मुंबई, पालघरच्या सर्व मिसिंग केसचाचा आधार घेतला होता.

सानियाला आई वडील नव्हते. मोठ्या चुलत्यांनी तिचं पालनपोषन आणि लग्न केलं. मयत सानियाच्या कुटुंबीयांनी सानियावर होणाऱ्या अत्याचाराचा पाढा वाचला. सानियाने या पूर्वी आचोळे पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु, पोलिसांनी तिच्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचं सानियाच्या कुटुंबाने सांगितलं आहे.

Related Articles

Latest Articles

महाराष्ट्र न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img
spot_img

लोकशाही न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img

लग्नाचं आमिष देत,मुलीवरच 13 वर्षं बलात्कार; हा प्रसिद्ध अभिनेता कोण ?

छत्तीसगड पोलिसांनी बलात्कार आणि अनैसर्गिक सेक्स केल्याच्या आरोपाखाली अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक मनोज राजपूतला अटक केली आहे. मनोज राजपूतवर आपल्याच एका जवळच्या नातेवाईकावर लग्नाचं...

भगवान शंकराचे स्तंभेश्वर मंदिर,दिवसातून दोनदा गायब होतं महादेवाचे ‘हे’ मंदिर

भारतीय हिंदू संस्कृतीत मंदिराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंदिर हे देवाचे स्थान आहे. भारतात फक्त पूजा-अर्चनाच नाही तर इतरही धार्मिक कार्ये केला जातात. भारतातील अशी अनेक...

‘सीता’ सिंहिण ‘अकबर’ सिंह नावावरण वाद, हायकोर्टाने दिला मोठा निर्णय..

पश्चिम बंगालमधल्या (West Bengal) एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि सिंहिणीला देण्यात आलेल्या नावावरुन मोठा वाद उभा राहिला आहे. हे प्रकरण कोलकाता हायकोर्टापर्यंत पोहोचलं आहे. हायकोर्टाने...

अकॅडमीच्या संचालकने ‘तू काळी आहेस’ म्हणून हिणवले, तरुणीने संपवलं जीवन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, वाळूज भागातील बजाजनगरातील गरुडझेप अकॅडमीत पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या एका 19 वर्षांच्या...

हुक्का बारवर बंदी विधेयकास मंजुरी; सिगारेट विक्रीवरही राहणार बंदी; दंडासह तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास

राज्याने २१ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. बंगळूर : कर्नाटक सरकारने (Karnataka Government) बुधवारी राज्यभरात हुक्का बारवर...