Video : व्हिडिओ

500 महाकाय झाडांचा बळी,बेघर झाल्याने हजारो पक्षांचा आक्रोश,वटवाघुळाची वृक्ष तोडणाऱ्याच्या पायाला मिठी!


बीड : बीडच्या आंबेजोगाई शहरात नगर परिषदेच्या वतीने रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या रुंदीकरणाच्या कामात तब्बल 500 महाकाय झाडांचा बळी घेतला जात आहे.

झाडे तोडताना पक्षांनीदेखील मोठा आक्रोश केला. वृक्ष तोडणाऱ्याच्या पायाला वटवाघुळाने मिठी मारली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जणू वटवाघुळ देखील झाडे तोडू नका अशीच तोडणाऱ्यांना विनंती करत आहे. मात्र, त्याला बाजूला काढून वृक्ष तोडण्याचे काम सुरू आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे न्युज लोकमत ने यासंमधी माहीती दिली आहे

वृक्षमित्र सुधाकर देशमुख ही पाचशे झाड वाचवण्यासाठी लढत आहेत. मात्र, नगरपालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तर महाकाय झाडे तोडल्यानंतर पक्षाची घरटी उध्वस्त झाल्याने पक्षी आकाशात सैराभैरा फिरत असल्याचे चित्र काळीज पिळवटून टाकणार आहे. वृक्षतोड थांबवली नाही तर नगरपालिका कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्ते सुधाकर देशमुख यांनी दिला आहे.

 

नवीन वर्षात राशीनुसार करा महादेवाचा अभिषेक, मिळेल भाग्याची साथ


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *