वन्यप्राण्यांमुळे पीक नुकसान झाल्यास किती मदत? हल्ल्यात मृत्यू झाल्यास २० लाखांपर्यंत मदत

spot_img

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास २० लाखांपर्यंत मदत दिली जाते. तसेच वन्यप्राण्यांनी शेतीचे नुकसान केल्यास मदत दिली जात आहे. त्यासाठी वनविभाग कार्यालयाकडे वेळेवर अर्ज करावा लागतो.

अर्ज करण्यासाठी विशिष्ट कालावधी दिला आहे, त्यानंतर ही मदत देऊ केली जाते. मागील तीन वर्षाच्या कालावधीत अनेक शेतकऱ्यांना मदत देण्यात आलेली आहे.

पिके बहरात आली असताना पिकांचे नुकसान झाल्यास संबंधित शेतकऱ्यास मोठा आर्थिक फटका बसतो. यासोबतच वन्यप्राण्यांनी हल्ला केल्यास शेतकरी गंभीर जखमी किंवा बहुतांश वेळा मृतदेखील होतो. अशावेळी शेतकऱ्यांना कमी कालावधीत मदत मिळणे अपेक्षित आहे. वनविभागाकडे वेळेवर अर्ज केल्यास मदत दिली जाते. वनविभागाने यासाठी नियमावली बनविली आहे.

५२५ शेतकऱ्यांना ६७ लाखांची मदत मागील तीन वर्षाच्या कालावधीत बीड जिल्ह्यातील विविध भागांत वन्य जीवांनी शेतकऱ्यांवर, पशुधनावर हल्ले केले, पिकांचे नुकसान केले. भरपाई म्हणून वनविभागाने जिल्ह्यातील ५२५ शेतकऱ्यांना ६७.३२ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.

पूर्वी वन्यप्राणी हल्ला व शेती नुकसानीसाठी कमी मदत दिली जात होती. परंतु ऑगस्ट २०२२ पासून त्यात वाढ झाली असल्याने नवीन नियमानुसार मदत दिली जात आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांना दिला जात आहे. वनविभागाकडे अर्ज आल्यास तत्काळ कारवाईला सुरुवात केली जाते. अनेक प्रकरणे मदतीस पात्र असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदत प्राप्त होते. वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती, रानकुत्रे यांच्या हल्ल्यामुळे मनुष्य हानी तसेच पशुधनाचा मृत्यू झाल्यास मदत दिली जाते.

हल्ला झालेल्या व्यक्तीने अथवा त्यांच्या नातेवाइकांनी हल्ला झाल्यापासून ४८ तासांत नजीकच्या वन अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला कळविणे आवश्यक आहे.

पीक नुकसान झाल्यास किती मदत?

जिल्ह्यातील पाटोदा, बीड, गेवराई या तालुक्यांत रानडुकरांचा त्रास शेतकऱ्यांना आहे. पिकांचे नुकसान झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित शेतीचा पंचनामा करून किती नुकसान झाले आहे, त्या आधारावर आर्थिक मदत दिली जाते.

हल्ल्यात मृत्यू झाल्यास २० लाखांपर्यंत मदत

शेतकरी किवा सामान्य व्यक्त्ती वन्य जीवांच्या हल्ल्यात मृत झाल्यास २० लाख रुपये दिले जातात. १० लाख रुपये धनादेशाद्वारे तर १० लाख रुपये राष्ट्रीयीकृत बँकेत असलेल्या दरमहा व्याज देणाऱ्या संयुक्त खात्यामध्ये जमा केले जातात. अपंग झाल्यास ५ लाख रुपये, व्यक्ती गंभीर जखमी झाल्यास १ लाख २५ हजार, किरकोळ जखमी झाल्यास औषधोपचारासाठी येणारा खर्च दिला जातो.

वर्षा उसगांवकरचा ‘ओली की सुकी’ चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर

Related Articles

Latest Articles

महाराष्ट्र न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img
spot_img

लोकशाही न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img

भगवान शंकराचे स्तंभेश्वर मंदिर,दिवसातून दोनदा गायब होतं महादेवाचे ‘हे’ मंदिर

भारतीय हिंदू संस्कृतीत मंदिराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंदिर हे देवाचे स्थान आहे. भारतात फक्त पूजा-अर्चनाच नाही तर इतरही धार्मिक कार्ये केला जातात. भारतातील अशी अनेक...

‘सीता’ सिंहिण ‘अकबर’ सिंह नावावरण वाद, हायकोर्टाने दिला मोठा निर्णय..

पश्चिम बंगालमधल्या (West Bengal) एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि सिंहिणीला देण्यात आलेल्या नावावरुन मोठा वाद उभा राहिला आहे. हे प्रकरण कोलकाता हायकोर्टापर्यंत पोहोचलं आहे. हायकोर्टाने...

अकॅडमीच्या संचालकने ‘तू काळी आहेस’ म्हणून हिणवले, तरुणीने संपवलं जीवन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, वाळूज भागातील बजाजनगरातील गरुडझेप अकॅडमीत पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या एका 19 वर्षांच्या...

हुक्का बारवर बंदी विधेयकास मंजुरी; सिगारेट विक्रीवरही राहणार बंदी; दंडासह तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास

राज्याने २१ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. बंगळूर : कर्नाटक सरकारने (Karnataka Government) बुधवारी राज्यभरात हुक्का बारवर...

एसटीचा मोफत प्रवास,दरवर्षी सलग सहा महिन्यांकरिता मोफत प्रवास पास मिळणार कोणाला ?

महाराष्ट्रातील एसटी महामंडळाकडून विविध प्रकारच्या सवलती दिल्या जात असून त्यात सर्व वर्गातील महिलांसाठी बस तिकिटांवर 50% सवलत सुरू आहे. अशातच परिवहन महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना...