शेत शिवार

राज्यातून महानंद गुजरातला जाणार?; ‘राज्यात आता धृतराष्ट्रांचं सरकार’


महानंदसारखा दुध प्रकल्प गुजरातला नेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महानंद दूध प्रकल्प गुजरातला नेला तर आम्ही गप्प बसणार नाही अशा थेट इशारा संजय राऊतांनी सरकारला दिला आहे.

महाराष्ट्रात अनेक दुधाचे ब्रँड आहेत. ग्रामीण भागामध्ये दूध उत्पादनाचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. त्यासाठी राज्यामध्ये अमूलच पाहिजे असं नाही. कर्नाटकमध्ये अशाच प्रकारचा एक ब्रँड केंद्र सरकारने मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या एका नंदिनी ब्रँडवर कर्नाटक सरकारची निवडणूक लढवली गेली, असं देखील राऊत म्हणालेत.

राज्यात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यामुळे दुधाचे ब्रॅण्ड जास्त आहेत. राज्यातील रोज एक प्रकल्प गुजरातला नेला जात आहे. तरीही सत्ताधारी गप्प बसले आहेत. हे कसले महाराष्ट्राचे राज्यकर्ते आहेत? दुग्ध व्यवसायाची प्रत्येक गोष्ट तुम्ही घेऊन जात आहात. पण जर महानंदा नेण्याचा प्रकार झाला तर आता शिवसेना गप्प बसणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

राज्यात महानंद, गोकुळ, वारणा, दूधगंगा, नंदीनी, चितळे असे अनेक विविध ब्रँण्ड आहेत. ग्रामीण भागात दूधाचे मोठे अर्थकारण आहे. त्यासाठी गुजरातचे अमूलचं पाहिजे असं नाही. तसंच कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीवेळी सरकारने कर्नाटकात नंदीनी नेले. आणि त्या मुद्द्यांवर भाजपने त्याठिकाणी निवडणूक लढवली. आता पुन्हा राज्यातील नामवंत असणारा महानंद सारखा ब्रँण्ड गुजरात नेण्याचा डाव आखला जात आहे, या सगळ्यामागे नेमकं कोण आहे? सरकार यावर गप्प का? असा सवाल देखील राऊत यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

दरम्यान, राज्यातून दररोज एक व्यवसाय गुजरातला नेला जात आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काही बोलत नाहीत हे कसले राज्यकर्ते? महाराष्ट्राला भरदिवसा लुबाडले जात आहे. तरी हे राज्यकर्ते गप्प का? असा सवाल देखील राऊतांनी उपस्थित केला आहे. राज्यात आता धृतराष्ट्रांचं सरकार निर्माण झालं आहे. जे महाराष्ट्राचा अपमान उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत, असंही राऊत म्हणालेत.

प्रेमी युगुलाने पळून जाऊन केलं लग्न, १५ दिवसांनी घरी येताच दोन्ही कुटुंबात राडा


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *