पुण्यात चालणार आता हवेतून गाड्या ! चांदणी चौकातून नितीन गडकरी गरजले

0
83
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

पुणे : पुण्यातील बहुचर्चित असलेल्या चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे आज केंद्रीय वाहतूक आणि रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे इतर नेते उपस्थित होते.

पुण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हवेतून चालणाऱ्या गाड्यांची योजना आणणार असल्याचं आश्वासन गडकरी यांनी यावेळी भाषणात दिलं.

दरम्यान, “पुण्यात सध्या वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. चांदणी चौकातील कामासाठीसुद्धा वाहतूक कोंडीमुळे बरेच अडथळे आले, तर ही समस्या कायमची सोडण्यासाठी आपण नवी योजना आणणार आहोत. हवेतून चालणाऱ्या बस आपण येथे आणणार असून या स्काय वॉक बसमधून एका वेळेस २५० प्रवासी प्रवास करू शकतात” असं आश्वासन नितीन गडकरी यांनी यावेळी दिलं.

Chandani Chowk Inauguration : केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते झाले चांदणी चौकातील नव्या पुलाचे लोकार्पण
पुण्यात वाहनांची संख्या वाढली असल्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता पुण्यात वाहनांची संख्या वाढवू नका. कारण इथे खूप प्रदूषण झालंय, आपल्याला पेट्रोल डिझेलला देशातून हद्दपार करायचं आहे. त्यामुळे 40 टक्के प्रदूषण कमी होईल असं गडकरी म्हणाले.

व्हीआयपी कल्चर गेलं पाहिजे, सायरनचा कर्कश आवाज गेला पाहिजे, एकंदरीत पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अनेक योजना आहेत. त्यापैकी रिंग रोडही लवकरच पूर्ण होईल, मेट्रोचे कामही आता शेवटच्या टप्प्यात आहे, तर आपण स्कायवॉक बसची योजना आणणार असल्याचं नितीन गडकरी म्हणाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here