दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू

पिंपरी -भरधाव वेगातील कंटेनर अचानक थांबल्यामुळे कंटेनरवर पाठीमागून मोटार धडकली. या अपघातात मोटारीतील एका महिलेचा मृत्यू झाला. पुणे-बेंगळुरूपिंपरी -भरधाव वेगातील कंटेनर अचानक थांबल्यामुळे कंटेनरवर पाठीमागून मोटार धडकली. या अपघातात मोटारीतील एका महिलेचा मृत्यू झाला. पुणे-बेंगळुरू महामार्गावर पुनावळे येथे सोमवारी (दि. 28) पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला.

प्रज्ञा कैलास उपरे, असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. कैलास तुळशीराम उपरे (वय 35, रा. तळेगाव दाभाडे) यांनी सोमवारी (दि. 28) याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात कंटेनर चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. फिर्यादी हे त्यांची पत्नी आणि मुलांसोबत त्यांच्या मोटारीतून सोमवारी चालले होते.

पहाटे चार वाजताच्या सुमारास ते पुणे बेंगळुरू महामार्गावरील पुनावळे येथे आले असता त्यांच्या समोर चाललेला कंटनेर अचानक थांबला. त्यामुळे फिर्यादीचे चारचाकी वाहन कंटेनरला पाठीमागून धडकले. यात फिर्यादी आणि त्यांची मुले जखमी झाली. तसेच फिर्यादीची पत्नी प्रज्ञा उपरे यांचा या अपघातात मृत्यू झाला.

अपघातात दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू पिंपरी -ट्रेलरच्या चाकाखाली आलेल्या दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. तळवडे येथे सोमवारी (दि. 28) सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. उर्मिला संतोष लावंड (वय 40), असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार महिलेचे नाव आहे. नागेश तुकाराम शिंदे (वय 42, रा. तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीची बहीण उर्मिला लावंड या मेसचे डबे पोहचवून दुचाकीवरून घरी येत होत्या. त्यावेळी ट्रेलरचा धक्का लागून उर्मिला लावंड या दुचाकीसह खाली पडल्या. या अपघातात ट्रेलरखाली चिरडून गंभीर जखमी झाल्याने उर्मिला लावंड यांचा मृत्यू झाला.

महामार्गावर पुनावळे येथे सोमवारी (दि.
28) पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here