राजकीय

नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी बिनशर्त पाठिंबा – राज ठाकरे


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुडी पाडवा मेळाव्याला एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार का?

या विषयी चर्चा सुरु होती. त्या प्रश्नावर राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. राज ठाकरे यांनी दादरच्या शिवाजी पार्क मैदानातून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या चर्चेतले मुद्दे सुद्धा त्यांनी सांगितले. आपल्याला एक तू घे, दोन मी घेतो, अशा प्रकारच्या जागा वाटपाच्या चर्चेत रस नसल्याच राज ठाकरे यांनी सांगितलं. त्यांनी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यांनी मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारी लागण्याची सूचना केली.

राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर ते महायुतीच्या प्रचाराला जाणार का? अशी चर्चा सुरु झाली. त्यावर राज ठाकरे यांनी आज उत्तर दिलं. पत्रकारांनी राज ठाकरे यांना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला जाणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, “मी सकारात्मक आहे. पण अजून काही ठरवलेलं नाही. कुठे प्रचार सभा घ्यायची, कुठे नाही. पुढे बघू, आमच्या बुकींग असतात. त्यामुळे सभा होतात”

राज ठाकरे दोन दिवसात कुठली यादी काढणार?

“भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या तीन पक्षाच्या लोकांनी किंवा उमेदवारांनी आमच्या कोणत्या लोकांशी संपर्क साधायचा कुणाशी बोलायचं आणि पुढे कशाप्रकारचं जायचं त्याची यादी दोन दिवसात तयार होईल. त्यांच्यापर्यंत जाईल. आमचेही पदाधिकारी असतील त्यांना योग्य मानाने वागवतील अशी अपेक्षा आहे. कुणाशी संपर्क साधायचा याचा घोळ नको म्हणून यादी देऊ. त्यांनाही सोयीस्कर जाईल. पूर्णपणे सहकार्य करायचं आहे. पूर्ण प्रचार करायचा आहे. संपर्क साधल्यावरच प्रत्यक्ष काम सुरू होईल” असं राज ठाकरे म्हणाले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *