अभिनेता विजय देवरकोंडा लवकरच अडकणार विवाहबंधनात?

0
19
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

मुंबई – अभिनेता विजय देवरकोंडा त्याच्या अभिनयासाठी आणि स्टाइलसाठी अधिक ओळखला जातो. रश्मिका मंदाना ही विजय देवरकोंडासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा नेहमीच रंगलेली असते. मात्र अनेकदा त्यांनी रिलेशनशिपच्या चर्चा दोघांनीही फेटाळून लावल्या आहेत.

यातच आता एका मुलाखतीमध्ये विजयने त्याच्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे. सध्या त्याने केलेले विधान विशेष चर्चेत आले आहे.

विजय म्हणाला, “मला लग्नाबद्दल बोलायला आवडते. लवकरच मला लग्न करण्याची गरज आहे. कदाचित ती वेळ जवळ आली आहे. पण मला त्याबद्दल बोलण्याचीही मजा येते. आयुष्यातील हा एक असा टप्पा आहे, जो प्रत्येकाने अनुभवला पाहिजे. पुढील दोन-तीन वर्षांत मी लग्न करणार आहे. मला आधी लग्नाबद्दल बोलणं आवडायचं नाही, मात्र आता त्या विषयावर बोलायला काहीच अडचण वाटत नाही. माझ्यासाठी आधी लग्न असा शब्द होता जो माझ्या आजूबाजूला असलेले लोक टाळायचे. त्या विषयावरून मी लगेच चिडायचो. मला माझ्या मित्रमैत्रिणींना लग्न करता पाहून आनंद होतो. आनंदी वैवाहिक जीवन, काही त्रासदायक नाती या सर्व गोष्टी मी पाहतोय आणि ते पाहताना मलाही मजा येते. माझंही स्वत:चं वैवाहिक जीवन असावं, असं मला आता वाटू लागलं आहे. आयुष्यातील हा टप्पा प्रत्येकाने अनुभवला पाहिजे”, असं तो म्हणाला.

नात्यांबाबत बोलताना तो म्हणाला की, “आयुष्यात एकमेकांना समजून घेणं आणि प्रेमाने वागणं खूप महत्त्वाचं असतं. मला असे वाटते की नातं म्हणजे एक प्रकारची भागीदारीच असते. प्रत्येक गोष्टीत आपण एकत्र उभं राहणं गरजेचं असतं.” मात्र विजय सध्या योग्य मुलीच्या शोधातच असल्याचेही म्हंटला आहे. यावरून आता विजय लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here