मुंबई : भारताकडे अत्याधुनिक शस्त्रसाठा आहे. यामध्ये अनेक मिसाईल्स म्हणजेच क्षेपणास्त्र आहेत. भारतातील काही महत्त्वाची मिसाईल्स आणि त्यांची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात.1. अग्नि 5अग्नि 5 हे एक ICBM क्लासचं बॅलेस्टिक मिसाईल आहे.
त्याची मारक क्षमता 5 हजार किलोमीटर्सपेक्षा जास्त आहे. अवघ्या 20 मिनिटांत आपलं लक्ष्य भेदण्यास सक्षम असलेल्या या मिसाईलमध्ये एक टन अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे. त्यात रिंग लेझर गायरोस्कोप, इनर्शियल नेव्हिगेशन प्रणाली व पर्यायी जी.पी.एस.चा वापर करण्यात आला आहे.2.संरक्षणतज्ज्ञांच्या मते, हे मिसाईल बीजिंग, शांघाय, ग्वांगझाउ, हाँगकाँगसह पूर्ण चीनला लक्ष्य करण्यास सक्षम आहे.3. ब्राह्मोसब्राह्मोस हे एक क्रूझ मिसाईल आहे.
त्याची मारक क्षमता 3 हजार किलोमीटर्सपेक्षा जास्त आहे. ब्राह्मोस सध्या जगातील सर्वात वेगवान आणि अचूक क्रूझ मिसाईल मानले जाते. ब्राह्मोस एका सेकंदात 1 किमी अंतर पार करते. तसंच त्याची नेम चुकण्याची क्षमता (सर्क्युलर एरर ऑफ प्रॉबॅबिलिटी – सीईपी) 1 मीटरपेक्षा कमी असल्याचा दावा केला जातो.4. धनुष्यहे एक SRBM बॅलेस्टिक मिसाईल आहे.
त्याची मारक क्षमता 350 किलोमीटरपर्यंत आहे. धनुष्यची लांबी 9 मीटर आहे तर हे एक मीटर रुंद आहे. याचं वजन 4 हजार किलो आहे. सुमारे 500 किलो अण्वस्त्रं वाहून नेण्याची क्षमता या मिसाईलमध्ये आहे.
हे भारतीय बनावटीचं मिसाईल आहे.5. एक्सोसेटहे एक ASCM मिसाईल आहे. ते फ्रेंच बनावटीचे आहे.6. निर्भयनिर्भय हे एक क्रूझ मिसाईल आहे.
या मिसाईलची क्षमता अमेरिकेच्या टॉमहॉम मिसाईल इतकी आहे. निर्भय हे स्वदेशी बनावटीचे क्रूझ मिसाईल डीआरडीओने विकसित केलेले आहे. त्याचा पल्ला एक हजार किमी असून ते 300 किलो वजनाची स्फोटके वाहून नेऊ शकते. निर्भय हे सबसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे.
निर्भयची लांबी 6 मीटर, रुंदी 0.52 मीटर आणि वजन 1500 किलो आहे. निर्भयवरून गरजेनुसार 200 ते 300 किलो वजनाची आणि 24 वेगवेगळ्या प्रकारची स्फोटकं किंवा बॉम्ब लक्ष्यावर अचूक मारता येतात.7. प्रहारहे एक SRBM बॅलेस्टिक मिसाईल आहे. ते 150 किलोमीटरपर्यंत लक्ष्यावर निशाणा साधू शकते. प्रहार हे स्वदेशी बनावटीचे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं अत्याधुनिक मिसाईल आहे. ते 200 किलोग्रॅम वजनाची स्फोटकं वाहून नेऊ शकते. वेगवेगळे बॉम्ब एकाच वेळी वेगवेगळ्या लक्ष्यांवर टाकण्याची क्षमता प्रहारमध्ये आहे.