Manoj Jarange Patilमराठा आरक्षण

जरांगे पाटील रूग्णालयात दाखल,मंत्री भुजबळ यांची भविष्यवाणी खरी ठरली!


वडीगोद्री : जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी २० जानेवारीपासून आमरण उपोषणाची घोषणा बीड येथील सभेत केली. या सभेनंतर ते आंतरवाली सराटी येथे परतले आणि आजारी असल्याने रुग्णालयात दाखल झाले.

मात्र ते रुग्णालयात दाखल झाल्याचा विषय खूप चर्चेत आला आहे. कारण जरांगे यांच्या उपोषणाच्या घोषणेनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे प्रथम रुग्णालयात दाखल होतील त्यानंतर उपोषणाला बसतील अशी भविष्यवाणी केली होती. या भविष्यवाणीप्रमाणे घडलेल्या गोष्टीची सोशल मीडियावर चर्चा आहे.

पाचव्या टप्प्यातील चार दिवसाच्या संवाद दौऱ्यावरून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील शनिवारी (दि. २३) रात्री अंतरवाली सराटीत परतले. यावेळी गावकऱ्यांनी त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. गावातील महिलांनी मनोज जरांगे यांचे औक्षण केले. चार दिवसाचा अत्यंत दगदगीचा धावत्या दौऱ्यावर असल्याने त्यांना अंगदुखी, सर्दी, खोकला आणि तापेची कणकन जाणवत असल्याने त्यांना रविवार रोजी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांच्या रक्ताच्या विविध चाचण्या करून पुढील उपचार करण्यात येतील असे डॉ.विनोद चावरे यांनी सांगितले.

जास्त घेतल्यामुळे भाषणात विसरण्याचा,छगन भुजबळ अशा कोल्हेकुईला दाद देत नाही,छगन भुजबळ यांचा जरांगे यांच्यावर घणाघाती हल्ला


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *