शिक्षक व प्राध्यापकांच्या प्रश्नांसाठी झगडणारी एकमेव संघटना – प्रा.प्रदिप रोडे

spot_img

 

शिक्षक व प्राध्यापकांच्या प्रश्नांसाठी झगडणारी एकमेव संघटना – प्रा.प्रदिप रोडे
————————–

बीड : आष्टी तालुका मुप्टा संघटनेची सहविचार सभा दि.१२ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ६ वा.जगताप क्लासेस,मार्केट यार्ड,आष्टी येथे संघटनेचे सक्रीय सभासद तथा राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेंद्र लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या सहविचार सभेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुप्टा संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष प्रा.प्रदिप रोडे,मुप्टा संघटनेचे उर्दु विभागाचे राज्यसचिव शाहेद कादरी,मुप्टा संघटनेचे जेष्ठ नेते प्रा.राम गायकवाड,प्राचार्य सुनिल शिंदे उपस्थित होते.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुप्टा संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष प्रा.प्रदिप रोडे यांनी संघटनेची स्थापना,संघटनेने आजतागायत केलेली कामे,कोरोना काळात मृत पावलेल्या सभासदांना केलेली आर्थिक मदत,संघटना बांधणी संदर्भात तसेच शिक्षक व प्राध्यापकांच्या समस्या बाबत सविस्तर माहिती देवून शिक्षक व प्राध्यापकांच्या प्रश्नांसाठी झगडणारी मुप्टा ही एकमेव संघटना आहे असे सांगून रविवार दि.१६ जानेवारी २०२२ रोजी स.११ वा.तुलसी इंग्लिश स्कूल,संत ज्ञानेश्वर नगर,शासकीय आयटीआय मागे बीड येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी प्रथमतः माँ.जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले.तद्नंतर सहविचार सभेचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक यांचा आष्टी तालुका मुप्टा संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.मुप्टा संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रीरंग पवार यांनी सहविचार सभेचे प्रास्तविक केले.प्रास्तविकात त्यांनी आजपर्यंत आष्टी मुप्टा ने केलेल्या कार्याचा लेखाजोका मांडला.तसेच संघटनात्मक बांधणी,शिक्षक व प्राध्यापकांच्या विविध समस्या निराकारणाबाबत सखोल माहिती दिली.
तसेच यावेळी प्रा.राम गायकवाड यांनी संघटनेची ध्येय धोरणे,संघटना काय असते व काय करु शकते याबाबत मार्गदर्शन केले.मुप्टा संघटनेचे उर्दु विभागाचे राज्यसचिव शाहेद कादरी यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की,उर्दु विभाग राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात मोठ्या जोमाने व ताकदीने काम करत असून उर्दु विभागातील शिक्षक व प्राध्यापकांच्या समस्या निराकारण करण्यासाठी मोठा लढा देत असून अनेक प्रश्नांचा उहापोह करुन अनेक प्रश्न तात्काळ सोडविलेले आहेत.यामुळेच मुप्टा संघटना ही एक मोठी ताकद असून यामध्ये सर्वांनी सामील होण्याची अत्यंत गरज आहे.तसेच याप्रसंगी प्राचार्य सुनिल शिंदे यांनी मुप्टा संघटनेत सामील होवून तन,मन,धनाने सहकार्य करावे असे आवाहन केले.शेवटी अध्यक्षीय समारोपात राजेंद्र लाड यांनी सांगितले की,मुप्टा ही संघटना नसून ही एक शिक्षक व प्राध्यापकांच्या समस्या सोडविणारी चळवळ आहे.या चळवळीत शिक्षक व प्राध्यापकांनी तन,मन,धनाने सामील व्हावे.वेगवेगळ्या कार्यालयात मुप्टा संघटना म्हटले की,नावानेच कित्येक कामे होतात.एवढी मोठी ताकद मुप्टा संघटनेने निर्माण केलेली आहे.यामुळेच बीड जिल्ह्यातील अनेक प्राध्यापकांची व शिक्षकांची कामे पूर्णत्वास गेलेली आहेत.तेंव्हा अशा एका कर्तव्यदक्ष संघटनेत सर्वांनी सामील होवून आपले प्रश्न सोडवून घ्यावेत असेही आवाहन राजेंद्र लाड यांनी शेवटी केले.या सहविचार सभेचे बहारदार सुत्रसंचलन प्रा.नामदेव वाघुले यांनी केले तर आभार प्रा.सय्यद बशिर यांनी मानले.सदरील सहविचार सभेस प्रा.बाळासाहेब काकडे,प्रा.डाँ.एस.डी.ओव्हाळ,स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुभाष भादवे,ए.आर.पाचारणे,किरण खंडागळे,आर.एम.निकाळजे,प्रा.ए.एन.गायकवाड,प्रा.आर.के.सोनवणे,भा.द.जगताप,पत्रकार आण्णासाहेब साबळे आदी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.संघटनेच्या कार्यक्रमासाठी हाँल उपलब्ध करुन दिल्याबद्दल भा.द.जगताप यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.सहविचार सभेत कोवीडचे सर्व नियम पाळण्यात आले.शेवटी चहापान घेवून सहविचार सभा संपन्न झाली.

Related Articles

Latest Articles

महाराष्ट्र न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img
spot_img

लोकशाही न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img

स्कूटीवरून ऑफिसला जाणाऱ्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले उपचारादरम्यान तीचा मृत्यू , तो गंभीर…

केरळ : स्कूटीवरून ऑफिसला जाणाऱ्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याची घटना केरळमध्ये सोमवारी (19 फेब्रुवारी) घडली आहे. यात पीडित 32 वर्षीय महिलेचा...

VIDEO : भारतात अवघ्या १० रुपयांना मिळणारा कढीपत्ता कॅनडात मिळतोय ‘इतक्या’ रुपयांना

भारतीय मसाल्याच्या पदार्थांपैकी एक महत्त्वाचा पदार्थ आहे कढीपत्ता . खाद्यपदार्थाला स्वाद येण्यासाठी आपण फोडणीत त्याचा आवर्जून वापर करतो. त्यामुळे भारतातील अनेक खाद्यपदार्थांमध्ये तुम्हाला कढीपत्त्याचा...

पोलीस ठाण्यातच निरीक्षकाने डोक्यात झाडून घेतली गोळी

नाशिक : येथील अंबड पोलिस ठाण्यातील गुन्हेशोध शाखेचे पोलीस निरीक्षकांनी मंगळवारी (ता. २०) सकाळी साडेनऊ-पावणे दहाच्या सुमारास केबिनमध्ये स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉलव्हरमधून डोक्यात गोळी झाडून...

मनोज जरांगेंनी उपचार थांबवले, पुन्हा तीव्र उपोषण सुरु; विधेयक मंजूर झाल्यानंतर म्हणाले..

अंतरवाली सराटीः मराठा आरक्षणासाठी मंगळवारी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं होतं. अधिवेशनामध्ये मराठा समाजासाठी सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग असा प्रवर्ग निर्माण करत स्वतंत्र आरक्षण...

मेंदीचे खुनी हात,लग्नानंतर पाचव्याच दिवशी नवरीने घेतला पतीचा जीव..

लखनऊ : हत्येची एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मऊ येथे खुनाची ही खळबळजनक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एका...