देशात कोरोना बॉम्ब घेऊन विमान दाखल

देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असतानाच इटलीहून अमृतसरमध्ये दाखल झालेले युरो अटलांटिक एअरवेज या पोर्तुगीज कंपनीचे विमान देशात कोरोना बॉम्ब घेऊन दाखल झाले आहे.

कोविडविषयी सर्व लेटेस्ट अपडेट येथे वाचा
या चार्टर्ड विमानातून प्रवास करणाऱया एकूण 179 प्रवाशांपैकी 125 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. विमानतळ संचालक व्ही. के. सेठ यांनी याविषयीची माहिती दिली आहे.

बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास वाययू-661 हे चार्टर्ड विमान अमृतसर विमानतळावर दाखल झाले. विमानातून प्रवास करणारे सर्व प्रवासी पंजाबमधील असून विमानतळावर त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर या प्रवाशांनी विमानतळावरच गोंधळ घालायला सुरुवात केली. या प्रवाशांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले असून 72 तासांपूर्वीच त्यांनी कोरोना चाचणीदेखील केली होती. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचेही या प्रवाशांचे म्हणणे आहे. विमानातून प्रवास करणाऱया 179 प्रवाशांपैकी 19 लहान मुले असून त्यांची आरटीपीसीआर चाचणी झालेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here