पहिल्या दिवशी लस घेणार्‍या मुलांमध्ये नगर जिल्हा राज्यात तिसर्‍या स्थानावर

अहमदनगर, 04 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढली आहे. यामुळे प्रशासन डेक्खील सतर्क झाले आहे.

यातच सोमवारपासून (दि.3) जिल्ह्यातील 15 ते 18 वयोगटातील मुलांचे करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले आहे.पहिल्या दिवशी लस घेणार्‍या मुलांमध्ये नगर जिल्हा राज्यात तिसर्‍या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर ठाणे असून त्या ठिकाणी 17 हजार 999 तर दुसर्‍या स्थानावर पुणे असून त्याठिकाणी 16 हजार 515 तर नगर जिल्हा हा तिसर्‍या स्थानावर आहे.

जिल्ह्यात करोना प्रतिबंधक लसीकरणास 16 जानेवारी 2021 पासून सुरुवात झाली होती.

जिल्ह्यात आत्तापर्यंत उद्दिष्टापैकी 28 लाख 76 हजार 668 लोकांनी (75 टक्के) तर 17 लाख 27 हजार 225 (45 टक्के) लोकांनी लशीचे दोन्ही डोस पूर्ण केलेले आहेत.

आता ओमायक्रोन व्हेरिएंटमुळे राष्ट्रीय स्तरावरून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याची तसेच आरोग्य कर्मचारी,

फ्रन्टलाईन वर्कर, 60 वर्षांवरील व सहव्याधी असणार्‍यांना तिसरा डोस (प्रिकॉशन डोस) देण्याची सूचना देण्यात आली आहे.

दरम्यान जिल्ह्यात 2 लाख 38 हजार मुलांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट असून पहिल्याच दिवशी 15 हजार 209 मुलांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here