बीड भरदिवसाच दांम्पत्याला लुटले;मांजरसुंभा येथील घटना, साहेब गायब तक्रार देणार कोणाकडे ?

 

भरदिवसाच दांम्पत्याला लुटले;मांजरसुंभा येथील घटना
__
दि.२६ डिसेंबर रविवार रोजी सकाळी ९ वाजता मांजरसुंभा ता.जि.बीड येथे अनोळखी माणसाने श्री.किसन निवृत्ती कदम वय ६२ वर्षे व रूक्मिन किसन कदम वय ५० वर्षे मुळगाव मौजे. येळंबघाट ता.जि.बीड सध्या वास्तव्य मौजे मांजरसुंभा येथे महावितरणचे मुळे यांच्या ठिकाणी रखवालदारीचे काम करून गुजराण करतात, अनोळखी माणसाने मुरमाच्या गाडीतील डिझेल संपले म्हणून ५०० रूपये मागितले किसन कदम (मो. नं. ७७२१८८१५४०)यांनी कोणताही विचार न करताच पैसे दिले, त्याना चौकातुन कोणाकडुन तरी पैसे घेऊन देतो महणत सोबत नेले त्यानंतर ५ मिनिटात आलो म्हणून निघुन गेले, थोड्यावेळाने घरी आले असता पत्नी रूक्मिन किसन कदम यांना धमकाऊन त्यांच्या अंगावरील २ मंगळसुत्र व ७०-८० मणी काढुन घेऊन गेले.
याविषयी तक्रार करण्यासाठी नेकनुर पोलीस स्टेशन येथे गेले असता साहेब नसल्याने तक्रार न देताच परत आले

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो. नं.८१८०९२७५७२LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here