ताज्या बातम्यादेश-विदेशराजकीय

देशात राहायचं असेल, तर जय श्रीराम म्हणावंच लागेल, – नवनीत राणा


ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) चे प्रमुख असुदुद्दीन ओवेसी (AsaduddinOwaisi) यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी ओवैसी यांनी “बाबरी मशीद जिंदाबाद, बाबरी मशीद जिंदाबाद”, असे नारेही दिले होते.

दरम्यान, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (NavneetKaurRana) यांनी एमआयएमच्या प्रमुख्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “तुम्हाला या देशात राहायच असेल तर जय श्रीराम म्हणावेच लागेल. रामाचा आदर करावाचा लागेल”, नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

‘रामाचा आदर करावाचा लागेल’

ओवेसींना मी श्रीरामाचा आदर करतो, असे बोलताना पाहिले. तुम्हाला या देशात राहायच असेल तर जय श्रीराम म्हणावेच लागेल. रामाचा आदर करावाचा लागेल. कारण देशातील लोक गेल्या अनेक वर्षांपासून राम मंदिराबाबत आस्था लावली होती. ही आस्था यांच्या नशीबात नव्हती. रामानेच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडले, त्यांच्याच हातून राम मंदिराचे काम होणार होते, असेही नवनीत राणा यांनी स्पष्ट केले.

पीएम मोदींनी तारिखही सांगितली आणि मंदिरही बांधले

नवनीत राणा लोकसभेत बोलताना म्हणाल्या, “सर्वांनी गेल्या अनेक वर्षांपासून रामाबाबत वाचलय आणि लिहलं देखील आहे. राम मंदिर तुमच्या अजेंड्यात होते, आता काय झाले? असे म्हणत विरोधी पक्षांकडून गेल्या 10 वर्षांत सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली. तारिख केव्हा सांगणार? राम मंदिर केव्हा बनणार? असा सवालही पीएम मोदींना विचारला जात होता. ज्यांच्याकडे 50-60 वर्षे सत्ता होती, त्यांना मंदिर बांधता आले नाही, असे कमी नशीबवान लोकही आहेत. आमच्या पंतप्रधानांनी तारिखही सांगितली मंदिरही बांधले.” पीएम आमच्या आस्थेला नेहमी जीवंत ठेवले. रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही केली. लोकशाहीत राजा पीएम मोदींसारखा असायला हवा. मागील 10 वर्षात देशात चमत्कार केला आहे. पुढील काही वर्षात आणखी चांगले काम होईल. या टर्ममधील लोकसभेचे हे शेवटचे भाषण आहे. सर्व संसद सदस्यांकडून मी आशीर्वाद घेते, असेही राणा म्हणाल्या.

ओवेसी काय म्हणाले होते?

एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन ओवेसी यांनी काही वेळापूर्वी लोकसभेत “बाबरी मशीद जिंदाबाद” अशा घोषणा दिल्या. मोदी सरकार केवळ हिंदूत्वाचे सरकार आहे का? देशाला कोणताही धर्म नाही. मी बाबर, जिन्नांचा प्रवक्ता नाही. पण देशातील मुस्लिमांना तुम्ही काय संदेश देत आहात? असा सवाल ओवेसी यांनी लोकसभेत बोलताना केला होता.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *