मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

spot_img

अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. नाशिकच्या कार्यालयात पत्र पाठवून ठार मारण्यात येणार असल्याची माहिती भुजबळांना कळविण्यात आली आहे. भुजबळ यांना धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी सुरक्षा वाढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

पत्रात काय लिहिलंय?

‘साहेब तुम्हाला उडविण्याची सुपारी ५ जणांनी घेतली आहे. तुम्हाला उडविण्यासाठी ५० लाखांची सुपारी घेण्यात आली आहे. या गुंडापासून सावध राहा. हे ५ जण तुम्हाला रात्रभर शोधत फिरत आहे. तुम्ही त्यांच्यापासून सावध राहा, असा मजकूर पत्रात लिहिण्यात आला आहे.

दरम्यान, मंत्री छगन भुजबळ ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरून राज्यभरात दौरा करत आहेत. आरक्षणाच्या मुद्यावरून छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.

मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मागच्या वेळी एका व्यक्तीने फोनवर सलग १२ मेसेज पाठवत भुजबळांना धमकी दिली होती. त्यानंतर पक्षाचे पदाधिकारी मनोज घोडके यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पुन्हा एकदा भुजबळांना धमकी मिळाली असून कार्यकर्त्यांनी सुरक्षा वाढविण्याची मागणी केली आहे.

छगन भुजबळ यांना नाशिकच्या कार्यालयात पत्र पाठवून ठार मारण्याची सुपारी घेतली असल्याचा मजकूर पत्रात आहे. अज्ञात व्यक्तींकडून आपल्याला ठार मारले जाईल, अशी माहिती एका पत्राद्वारे भुजबळांना पाठविण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून मंत्री छगन भुजबळ यांना सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.

मागच्या वेळी छत्रपती संभाजीनगर शहरातील एका तरुणाने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्यांच्या निवास्थानाबाहेरील बंदोबस्त वाढवला होता. त्यानंतर भुजबळ यांच्या ताफ्यातील सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा धमकी आल्याने त्यांची सुरक्षा पुन्हा वाढविण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे.

Related Articles

Latest Articles

महाराष्ट्र न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img
spot_img

लोकशाही न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img

भगवान शंकराचे स्तंभेश्वर मंदिर,दिवसातून दोनदा गायब होतं महादेवाचे ‘हे’ मंदिर

भारतीय हिंदू संस्कृतीत मंदिराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंदिर हे देवाचे स्थान आहे. भारतात फक्त पूजा-अर्चनाच नाही तर इतरही धार्मिक कार्ये केला जातात. भारतातील अशी अनेक...

‘सीता’ सिंहिण ‘अकबर’ सिंह नावावरण वाद, हायकोर्टाने दिला मोठा निर्णय..

पश्चिम बंगालमधल्या (West Bengal) एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि सिंहिणीला देण्यात आलेल्या नावावरुन मोठा वाद उभा राहिला आहे. हे प्रकरण कोलकाता हायकोर्टापर्यंत पोहोचलं आहे. हायकोर्टाने...

अकॅडमीच्या संचालकने ‘तू काळी आहेस’ म्हणून हिणवले, तरुणीने संपवलं जीवन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, वाळूज भागातील बजाजनगरातील गरुडझेप अकॅडमीत पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या एका 19 वर्षांच्या...

हुक्का बारवर बंदी विधेयकास मंजुरी; सिगारेट विक्रीवरही राहणार बंदी; दंडासह तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास

राज्याने २१ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. बंगळूर : कर्नाटक सरकारने (Karnataka Government) बुधवारी राज्यभरात हुक्का बारवर...

एसटीचा मोफत प्रवास,दरवर्षी सलग सहा महिन्यांकरिता मोफत प्रवास पास मिळणार कोणाला ?

महाराष्ट्रातील एसटी महामंडळाकडून विविध प्रकारच्या सवलती दिल्या जात असून त्यात सर्व वर्गातील महिलांसाठी बस तिकिटांवर 50% सवलत सुरू आहे. अशातच परिवहन महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना...