पार्टी आली अंगलट;108 बोकडांचा बळी,आयकरच्या छाप्यात 850 कोटींचं घबाड सापडलं

spot_img

नाशिक : नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकाच्या सरकारी कंत्राटदाराच्या कार्यालयावर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. या छाप्यात कोट्यवधी रुपयांचे घबाड हस्तगत करण्यात आले आहे. नाशिकमधील आयकर विभागाच्या या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.

मात्र या कारवाईआधी झालेल्या एका मोठ्या पार्टीची चर्चा शहरात होताना दिसत आहे. (Nashik Crime 108 Bucks Killed Party Aali Anglat 850 crore evasion was found in the income tax raid)

संबंधित कंत्राटदाराने गेल्या महिन्यात शहरातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रशस्त अशा मोठ्या डोममध्ये जागरण गोंधळाचा कार्यक्रम केला होता. या कार्यक्रमामध्ये 108 बोकडांचा बळी देऊन भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाची शहरभर चर्चा झाली आणि ती प्राप्तिकर विभागाकडेही पोहोचली. त्यानंतर नाशिक शहरांमध्ये प्राप्तिकर विभागाने छापे टाकून कारवाई केल्याची चर्चा आहे.

प्राप्तिकर विभागाच्या 200 हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 30 जानेवारी ते 4 फेब्रुवारीपर्यंत नाशिकमधील 8 शासकीय कंत्राटदारांच्या घर व कार्यालयांवर छापे टाकले. यात सुमारे 850 कोटींहून अधिक बेहिशेबी व्यवहाराची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सरकारी व खासगी बँकांच्या लॉकर्समध्ये 6 कोटी व इतरत्र दोन कोटींची रोकड, 3 कोटींचे दागिने, सोन्याची बिस्किटे सापडली आहेत. विशेष म्हणजे कंत्राटदारांनी व्यवहारांची कागदपत्रे कर्मचारी, नातलगांच्या घरी लपवल्याचेही तपासात उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंत्राटदाराच्या घरी लगीनघाई आहे. त्यामुळे जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतरच प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली आहे. आयकर विभागाच्या छापेमारीत कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराची कागदपत्रे, पेन ड्राइव्ह तपासणीसाठी जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय संबंधित व्यवसायांची खाती, संगणक, व्यवहार यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच काही कंत्राटदार कर्मचाऱ्यांच्या घरी, तर काहींच्या गाडीमधून रोकड जप्त जप्त करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराशी अत्यंत घनिष्ठ संबंध असलेल्या कंत्राटदारावर छापेमारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Related Articles

Latest Articles

महाराष्ट्र न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img
spot_img

लोकशाही न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img

स्कूटीवरून ऑफिसला जाणाऱ्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले उपचारादरम्यान तीचा मृत्यू , तो गंभीर…

केरळ : स्कूटीवरून ऑफिसला जाणाऱ्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याची घटना केरळमध्ये सोमवारी (19 फेब्रुवारी) घडली आहे. यात पीडित 32 वर्षीय महिलेचा...

VIDEO : भारतात अवघ्या १० रुपयांना मिळणारा कढीपत्ता कॅनडात मिळतोय ‘इतक्या’ रुपयांना

भारतीय मसाल्याच्या पदार्थांपैकी एक महत्त्वाचा पदार्थ आहे कढीपत्ता . खाद्यपदार्थाला स्वाद येण्यासाठी आपण फोडणीत त्याचा आवर्जून वापर करतो. त्यामुळे भारतातील अनेक खाद्यपदार्थांमध्ये तुम्हाला कढीपत्त्याचा...

पोलीस ठाण्यातच निरीक्षकाने डोक्यात झाडून घेतली गोळी

नाशिक : येथील अंबड पोलिस ठाण्यातील गुन्हेशोध शाखेचे पोलीस निरीक्षकांनी मंगळवारी (ता. २०) सकाळी साडेनऊ-पावणे दहाच्या सुमारास केबिनमध्ये स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉलव्हरमधून डोक्यात गोळी झाडून...

मनोज जरांगेंनी उपचार थांबवले, पुन्हा तीव्र उपोषण सुरु; विधेयक मंजूर झाल्यानंतर म्हणाले..

अंतरवाली सराटीः मराठा आरक्षणासाठी मंगळवारी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं होतं. अधिवेशनामध्ये मराठा समाजासाठी सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग असा प्रवर्ग निर्माण करत स्वतंत्र आरक्षण...

मेंदीचे खुनी हात,लग्नानंतर पाचव्याच दिवशी नवरीने घेतला पतीचा जीव..

लखनऊ : हत्येची एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मऊ येथे खुनाची ही खळबळजनक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एका...