Video : व्हिडिओताज्या बातम्यानागपूर

नागपूर स्फोटात सहा महिलांसह 9 जणांचा मृत्यू; राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर


नागपुरातील बाजार गाव येथे सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. या कंपनीत दारूगोळा बनवण्याचे काम सुरू असताना हा स्फोट झाला. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.
यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत घटनेबद्दल दुखः व्यक्त केलं. यासोबतच त्यांनी पीडितांना मदत देखील जाहीर केली.

सोलार कंपनी भारतातील अनेक संरक्षण क्षेत्राशी संबंधीत कंपन्यांना दारुगोळा पुरवठा करते. ‘एक्सप्लोझिव्ह’मध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलचा वापर होत असतो. हेच काम करत असताना आज स्फोट झाला. नऊ मृतांमध्ये युवराज चरोदे, ओमेश्वर मछिर्के, मिता युकी, आरती सहारे, श्वेताली मारबते, पुष्पा मनपुरे, भाग्यश्री लोणारे, रुमिता युकी, मोसम पटले यांचा समावेश आहे.

https://x.com/ANI/status/1736276224211841214?t=eZQxgn-t-DdRy-VKfTtqjQ&s=09

 

नागपुरातील सोलार एक्सप्लोरी कंपनीमध्ये नऊ वाजताच्या सुमारास झालेल्या स्फोटामध्ये मोठी दुर्घटना घडलेली आहे.

कंपनीत दारूगोळा बनवण्याचे काम सुरू असताना हा स्फोट झाल्याची माहिती आहे.

सोलार कंपनी भारतातील अनेक कंपन्यांना दारुगोळा सप्लाय करते. संरक्षण क्षेत्राशी निगडीत काही कंपन्यांना ही कंपनी दारूगोळा सप्लाय करत असल्याची माहिती आहे. ‘एक्सप्लोसिव्ह’मध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलचा वापर होत असतो. हेच काम करत असताना स्फोट झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, स्फोटामध्ये ९ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. नागपूरचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी ही माहिती दिली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *