ताज्या बातम्या

कर्णधारपदासोबतच रोहितने बॅटनेही हृदय जिंकणारी कामगिरी रोहितची ही ट्रिक अंतिम सामन्यात भारताला चॅम्पियन बनवनार !


भारत आणि ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपच्या 13 व्या सीझनच्या फायनलमध्ये आमने-सामने आहेत. ऑस्ट्रेलिया 5 वेळा विश्व विजेती राहिली आहे. तर भारताने 2 वेळा वर्ल्ड कप आपल्या नावे केला आहे.

या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने सलग 10 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. मात्र ऑस्ट्रेलियाला या वर्ल्ड कपमध्ये सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. मात्र यानंतर या चॅम्पियन टीमने जबरदस्त कमबॅक करत फायनलचं तिकीट पक्क केलं आहे.

भारतीय संघ तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. भारताने ग्रुप मॅचमध्येही ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव केला होता. त्यामुळे त्याचे मनोबल खूप उंचावले आहे. टीम इंडियाच्या या आश्चर्यकारक प्रवासात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणारा खेळाडू म्हणजे कर्णधार रोहित शर्मा हा आहे. कर्णधारपदासोबतच रोहितने बॅटनेही हृदय जिंकणारी कामगिरी केली आहे. आता रोहितची ही ट्रिक अंतिम सामन्यात भारताला चॅम्पियन बनवू शकते.

रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली तर भारतासाठी सर्वोत्तम गोष्ट असेल. भारताने प्रथम फलंदाजी केल्यास रोहितचा गेमप्लॅन स्पष्ट होईल. रोहित पॉवरप्लेमध्ये तुफान फलंदाजी करू इच्छितो, जेणेकरून कांगारूंवर सुरुवातीलाच दडपण निर्माण करता येईल. रोहितने जबरदस्त सुरुवात केल्यास बाकीच्या फलंदाजांवर झटपट धावा करण्याचे फारसे दडपण नसेल आणि भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी होईल.

रोहितकडे अनेक बाण आहेत. त्यांच्याकडे विराट कोहली, गिल, श्रेयस आणि केएल राहुलच्या रूपाने जबरदस्त फलंदाज आहेत. तर सूर्यकुमार यादव आणि रवींद्र जडेजा हे फिनिशरची भूमिका उत्तमरित्या पार पाडत आहेत. गोलंदाजीत मोहम्मद शमीने सहा सामने खेळून 23 बळी घेतले आहेत. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि जडेजा यांनीही चेंडूवर चमकदार कामगिरी केली आहे.

भारतीय क्रिकेटमधील ही सर्वात मोठी हॅट्रिक असेल का?
रोहित शर्माच्या कर्णधारपदात कपिल देवची दूरदृष्टी, सौरव गांगुलीची आक्रमकता आणि महेंद्रसिंग धोनीचा संयम यांचा मेळ आहे असंही म्हटलं जातंय. रोहितच्या आधी कपिल, गांगुली आणि धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विश्वचषकाची अंतिम फेरी गाठू शकला होता. कपिल देव (1983) आणि धोनी (2011) यांनीही भारताला चॅम्पियन बनवले होते. आता रोहितने संघाला चॅम्पियन बनवल्यास भारतीय क्रिकेटसाठी ती विजेतेपदाची हॅटट्रिक असेल.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *