9.3 C
New York
Sunday, May 12, 2024

Buy now

“गुणरत्न सदावर्ते यांच्या नालायकपणामुळेच मराठा आरक्षण हिसकावले गेले,संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ

- Advertisement -

राज्यात मराठा आरक्षणाचा (maratha aarakshan) मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. एकीकडे आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केले आहे.

- Advertisement -

तर दुसरीकडे त्यांच्यावर वकील गुणरत्न सदावर्ते (gunaratna sadavarte) यांच्याकडून टीका केली जात आहे. अशातच आता मुंबईत वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या आलिशान गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

काय म्हणाले आमदार संजय गायकवाड?

बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ उडाली आहे. “गुणरत्न सदावर्ते यांच्या नालायकपणामुळेच मराठा आरक्षण हिसकावले गेले. त्यांनी कोर्टात प्रखरपणे बाजू मांडली. ते सूडाने पेटलेला होते. आरक्षणामुळे जसे यांचे काही प्रचंड नुकसान होणार आहे. त्यांची गाडी तोडली ही शिक्षा कमी आहे. याला संपवायला पाहिजे होता. ज्यांनी कोणी हे केल ते कमी झाले. याची व्यवस्था चांगली करायला पाहिजे होती,” असे वक्तव्य संजय गायकवाड यांनी केले आहे.

दुसरीकडे, आमदार संजय गायकवाड यांनी आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय नेत्यांना केलेल्या गावबंदीबाबतही भाष्य केलं. “काही उत्साही कार्यकर्ते गावबंदी करत आहेत. मात्र अशी भूमिका घेऊ नये. मुख्यमंत्री शिंदे यांनी सुद्धा सांगितले की आरक्षण दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. सर्वांनी संयमाची भूमिका घेतली पाहिजे. मुख्यमंत्री शिंदे जीवावर खेळतील पण शब्द पडू देणार नाही. सर्वांनी त्यांच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे, असेही संजय गायकवाड म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांना अटक करा – गुणरत्न सदावर्ते

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या तोडफोडीनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या अटकेची मागणी केली. “हल्लेखोरांना आणि मनोज जरांगेंना मला प्रश्न विचारायचा आहे की, तुमच्या शांततामय आंदोलनाची हीच व्याख्या आहे का? मला गप्प केलं जाऊ शकत नाही. माझा लढा या देशातील 50 टक्के खुल्या जागा वाचवण्याचा आहे. या देशाला जातीपातीत तोडलं जाऊ नये यासाठी माझा लढा आहे,” असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles