19.1 C
New York
Sunday, May 26, 2024

Buy now

दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत पाकिस्तानचा अडथळा; मृतदेह ताब्यात घेत असताना भारतीय लष्करावर गोळीबार

- Advertisement -

नवी दिल्ली- भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईत आज तीन दहशतवाद्यांना मारण्यात यश आलं आहे. तीन दहशतवादी पाक व्याप्त जम्मूतील नियंत्रण रेषेतून जम्मू-काश्मिरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते.

- Advertisement -

यावेळी भारतीय जवानांनी त्या तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला.

- Advertisement -

भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने दिलेल्या माहितीनुसार, दोन दहशतवाद्यांचे मृतदेह मिळवण्यात यश आले आहे. पण, तिसऱ्या दहशतवाद्याचा मृतदेह ताब्यात घेत असताना पाकिस्तानी लष्कराने गोळीबार केला. त्यामुळे तिसऱ्या दहशतवाद्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात अडथळा येत आहे. ‘एक्स’वर याची माहिती देण्यात आली आहे.जम्मूच्या उरी भागात लष्कराची कारवाई सुरु आहे. यावेळी तीन दहशतवाद्यांचा कारवाईत मृत्यू झालाय. भारतीय लष्कर आणि काश्मिर पोलिस यांच्याकडून संयुक्त ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. यामध्ये पाकिस्तान अडथळा निर्माण करत असल्याचं सांगण्यात आलंय. सकाळी बारामुल्लातील उरी सेक्टरमध्ये तीन दहशतवादी भारतात घुसण्याच्या प्रयत्नात असताना भारतीय लष्कराने त्यांना ठार केले.

ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांचे मृतदेह भारतीय सैन्याने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. दोन दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले. पण, तिसऱ्या दहशतवाद्याचा मृतदेह ताब्यात घेत असताना पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार करण्यात आला आहे. ऑपरेशन सध्या सुरु असल्याची माहिती लष्कराने दिलीये.

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये संघर्ष सुरु आहे. भारतीय लष्कराच्या चार अधिकाऱ्यांचा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर भारतीय लष्कराने कारवाई कठोर केली होती. आज तीन दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यात आले आहे. भारतीय लष्कराकडून अजून शोध मोहीम सुरु आहे.

 

- Advertisement -

Related Articles

Latest Articles