मुंबई-गोवा महामार्गावर ट्रकच्या धडकेत टेम्पो चालकाचा मृत्यू

0
259
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

महाड : – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांच्या मालिका सुरूच आहेत. काल रात्री पावणेदोनच्या सुमारास गांधार पाले गावाचे हद्दीत रत्नागिरीकडून मुंबई दिशेने जाणारा आयशर टेम्पो (क्रमांक एम एच 8 ए पी 98 31) आणि ट्रकची धडक झालीय टेम्पो चालक वैभव राजाराम बेंनकर हा रत्नागिरीच्या दिशेने मुंबईकडे जात होता.

गांधार पाले गावाचे हद्दीत आला असता मुंबईकडून गोवाकडे येणारा ट्रक (क्रमांक आर जे २७ जी ८१६) चालकाने भरधाव वेगात टेम्पोला समोर धडक मारली. याप्रकरणी टेम्पोचालक वैभव बनकरचा मृत्यू झाला. अशी माहिती पोलीसांनी दिली.

या अपघातास कारणीभूत असलेल्या ट्रकचालक अपघाताची खबर न देताच पळून गेल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे. यामध्ये जखमी झालेला मनीष शामसुंदर मस्के (वय ३२ रा. तळे काठी तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी) याच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत.

या अपघाताप्रकरणी पोलीस सब इन्स्पेक्टर कांबळे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.
सदर अपघात प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २३९२३ भादवी कलम ३०४ अ, २७९, ३३७, ३३८, ३३८ मोटर वाहन कायदा कलम १८४, १३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here