ओएनजीसी तून तेल गळती ;उरणकर गॅसवर, जलचर प्राणी धोक्यात

0
223
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

उरण ओएनजीसी प्रकल्पमधुन शुक्रवारी पाहटे चार वाजन्याच्या सुमरास कच्छ्या तेलाची मोठ्या प्रमानात गळती झाली तेल गळती झाल्‍याचे लक्षात येताच प्रकल्पकडून नाल्यातून समुद्रामध्ये मिसाळणारे तेल थांबावण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे.

किनार्‍यावर आलेला तेलाचा जाड थर जमा करण्यासाठी कर्मचार्‍यांसह सक्शन पपं, ड्रम, सक्शन वॅन घटनास्थळी कार्यरत झाल्या आहेत.

तर समुद्राच्या पाण्यामध्ये तेल मिसळल्याने किनारी भागावरील मासे आणि तत्सम जीव धोक्यात आले आहेत. तर यावर उदरनिर्वाह करणार्‍या नागरिकांनाही याचा फटका बसणार आहे. ओएनजीसी प्रकल्पामधून अशा प्रकारे अनेकदा तेल गळती झाली असून, घडलेल्या घटनांमधून आजवर पाच जणांचा जीव गेला आहे.

यामध्ये एका स्थानिक नागरिक, तीन अग्निशमन दलाचे जवान आणि एका प्लांट मॅनेजरचा समावेश आहे. अशा संवेदनशील ओएनजीसी प्रकल्पामधून नियमित तेल आणि गॅसच्या वासामुळे स्थानिक ग्रामस्थांनी लेखी तक्रार करूनही कोणतीच कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

अशा घटनामधून होणारे अपघात आणि त्याची दाहकता एखाद्या दिवशी उरण भोपळ पेक्षाही बिकट अवस्था होण्याचा संशय ग्रामस्थांनी व्ये केला आहे. तरी कंपनी प्रशासन व शासकीय यंत्रणेने याची वेळीच दखल घ्यावी अन्यथा त्याचे दुष्परिणाम येथील स्थानिक जनतेला भोगावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान येथील नाल्यातून बाहेर येणारे तेल येथील पिकत्या शेत जमिनीमध्ये जातं असल्याने, शेत पिकाचे नुकसान होणार असल्याचा दावा येथील शेतकरी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here