तरुणीसोबत लॉजमध्ये गेलेल्या तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याची घटना भंडारा शहरातील हिरणवार लॉजमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.आजच्या तरुण-तरुणाईमध्ये डेट करण्याच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे, पण यातून भंडारा जिल्ह्यातील तरुणाला जीव गमवावा लागला आहे.नागपूरच्या कामठी भागात राहणाऱ्या 23 वर्षीय युवकाचे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील जरफडा येथील एका 23 वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध होते. 20 ऑगस्टला दोघंही भेटण्याकरता भंडाऱ्याला आले. पर्यटनस्थळं फिरून शहरात सामान खरेदी करून दोघांनी जेवण केलं, यानंतर दोघं शहरातील हिरणवार लॉजमध्ये मुक्कामी थांबले.युवकाने शक्तीवर्धक गोळ्या घेतल्या होत्या, अशी माहितीही समोर येत आहे. रात्री दोघंही झोपल्यानंतर तरुणी मध्यरात्री झोपेतून उठली, तेव्हा तिने प्रियकराला आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने काहीच हालचाल केली नाही. घाबरलेल्या मुलीने लॉजमधील कर्मचाऱ्यांना आवाज दिला, यानंतर युवकाला भंडाऱ्यामधील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं गेलं, पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.