इंजिनिअरिंग केले असेल तर रेल्वेत नोकरीची संधी; आजच अर्ज करा

0
169
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

मुंबई : रेल्वेत अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध असून त्यांना अर्ज करता येणार आहे. उत्तर रेल्वेत सिनिअर टेक्निकल असोसिएट पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ ऑगस्ट २०२३ आहे.

 

 

उत्तर रेल्वेत एकूण ९३ पदे रिक्त असून एसटीए (सिव्हिल) ६०पदे, एसटीए(इलेक्ट्रिकल) २० पदे, एसटीए (सिग्नल आणि टेलिकॉम) १३ पदे यासाठी उमेदवारास अर्ज करता येणार आहे. भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने सिव्हिल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग आणि सिग्नल आणि टेलिकॉममध्ये बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे.

 

 

याशिवाय, विविध पदांसाठी वयोमर्यादा २० ते ३४ वर्षे असून आरक्षित वर्गाला वयात सवलत मिळेल. तर उमेदवारांना कागदपत्रांची पडताळणी आणि GATE स्कोअरच्या आधारे निवडले जाईल. अर्जाची फी १०० रुपये असून उत्तीर्ण उमेदवारास पगार पदानुसार असेल. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला उत्तर रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट  द्यावी लागेल. तसेच, सीनिअर टेक्निकल असोसिएट या पदासाठी या वेबसाईटवरूनच अर्ज करता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here