“ब्राह्मणांच्या मुलींना.”, संभाजी भिडेप्रकरणावरून छगन भुजबळांचे वक्तव्य; म्हणाले, “मी पुराणांवर.”

0
451
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

संभाजी भिडे आणि अन्न व नागरी पुरवठा संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद आता विकोपाला पोहोचत आहे. संभाजी भिडे यांच्या मनोहर कुलकर्णी यांच्या नावाबाबत छगन भुजबळ यांनी खुलासा मागितला होता.यावेळी त्यांनी ब्राह्मण समाजाचा उल्लेख केल्याने ब्राह्मण समाजही आक्रमक झाला आहे. त्यावरून छगन भुजबळ यांनी पुन्हा आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

 

“संभाजी भिडे यांच्या नावाबाबत मी जे वक्तव्य केलं तिथे शाळकरी आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. आपण विज्ञानाची कास धरायला पाहिजे. पण संभाजी भिडे आंबा खा, अमुक खा तमुक खा सांगतात, महात्मांविरोधात बोलतात. हे संभाजी भिडे हे खरोखर मनोहर कुलकर्णी आहेत की नाही हे जाहीर करावं. कारण सहसा ब्राम्हणांमध्ये शिवाजी, संभाजी अशी नावं नसतात”, असं छगन भुजबळ आज पुन्हा म्हणाले

 

“मी असं वक्तव्य केल्यानंतर शिवाजीराव पटवर्धन वगैरे नावे दिली गेली. अशी दोन – चार नावे असतीलही. परंतु, अशी नावे सहसा नसतात. त्यामुळे हा मनोहर कुलकर्णी आहे की नाही हे सांगा. त्यांनी ते स्पष्ट करावं की ते संभाजी भिडे आहेत की मनोहर कुलकर्णी आहेत?” असा सवाल छगन भुजबळांनी उपस्थित केला.

 

 

ब्राह्मणांच्या मुलींनाही शिक्षणाचा अधिकार नव्हता

 

“ज्या शाळेत कार्यक्रम होता तिथे महात्मा फुले, सावित्राबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, रावसाहेब थोरातांपासून सर्वांचे छायाचित्र होते. यांनी शिक्षणाची गोडी निर्माण केली. हेच आपले देव आहेत. मुलांना आणि मुलींना कळलं पाहिजे की काय परिस्थिती होती, कशा परिस्थितीतून या लोकांनी आपल्याला शिक्षण दिलं. १५० पूर्वी शुद्रातिशूद्र लोकांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, तसा मुलींनाही नव्हता. तसा ब्राह्मणांच्या मुलींनाही शिक्षणाचा अधिकार नव्हता. हे विषय खोडून दाखवा. मी इतिहास बोलतोय, मी पुराणांवर भाष्य करत नाही”, असंही त्यानी पुढे स्पष्ट केल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here