अजित पवार यांच्यावरील टीकेवरुन सुप्रिया सुळे यांनी संजय राऊत यांना सुनावले, मोजक्या शब्दांत म्हणाल्या.

0
145
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. संजय राऊत यांनी रविवारी लिहिल्या रोखठोकमधून अजित पवार यांना लक्ष केले आहे.त्यात त्यांनी म्हटले आहे की, शरद पवार यांनी अनेक संस्था उभारल्या आहेत. त्यामधील अनेक संस्थांवर अजित पवार आहेत. यामुळे या संस्थांचे पुढे काय करायचे त्यावर चर्चेसाठी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. या संस्थांमधून अजित पवार यांनी बाहेर पडावे, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. राऊत यांच्या त्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. संजय राऊत यांनी खडेबोल सुनावले आहे.

 

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

 

टीव्ही ९ मराठीशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या की, आमचे राजकीय मतभेद आहे. परंतु आमच्यात मनभेद नाही. अजितदादांवर केलेल्या अशा टीकेबद्दल मला हसू येते. हे सर्व बाळबोध आहे. या सर्व संस्थांच्या काय करायचे ते आम्ही ठरवू. आम्ही नाती नेहमी जपली आहेत. घरातील नातीतर सोडा आज देशात अनेक ठिकाणी आमची नाती तयार झाली आहेत. माझ्यावर चव्हाण साहेबांचे संस्कार झाले आहे, पवार कुटुंबियांचे संस्कार आहे. यामुळे आम्ही सर्वांशी प्रेमाने बोलणार आहे, संजय राऊत यांचे वक्तव्य हे बाळबोध असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here