ताज्या बातम्या

वृद्धाची हत्या करून २ कोटींचा ऐवज लुटला; पोलिसांनी ‘ही’ युक्ती वापरून लावला शोध


अग्रवाल नामक वृद्ध जोडप्याला मुंबईतील ताडदेव परिसरात दोरीने बांधून लुटणाऱ्या आणि त्यानंतर वृद्धाची हत्या करणाऱ्या तीन आरोपींनी पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली आहे. आरोपींनी केलेल्या बॅंक व्यवहारावरून पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला.या गुन्ह्याची उकल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी सत्कार केला.

 

मुंबई: १३ ऑगस्टला सकाळी ताडदेव परिसरात वृद्ध जोडप्याला दोरीने बांधून लुटणाऱ्या आरोपीला अटक करून या प्रकरणाची उकल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी सत्कार केला. पोलिसांनी या प्रकरणाची उकल कशी केली हे खूपच रंजक आहे.

 

सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध: या प्रकरणाची उकल करण्यासाठी पोलिसांनी एकूण 20 टीम तयार केल्या होत्या. सर्व प्रथम, पोलिसांना आरोपींचे सीसीटीव्ही शोधले. ज्यामध्ये 3 आरोपी युसूफ मंझिल इमारतीतून लुटमार करून बाहेर जाताना दिसत आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांना त्या टॅक्सी चालकाची माहिती मिळाली. दादर स्थानकाबाहेर आरोपींना कोणी सोडले. दादरहून बसमध्ये बसून आरोपी पुण्याला निघाले होते. पुण्यात उतरल्यानंतर आरोपीने अनेकांना इंदूरला जाण्याचा रस्ता विचारला होता.

 

 

पत्ता चुकीचा, फोन नंबर बरोबर: सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले की, आरोपी राजस्थानचे रहिवासी आहेत. ते मुंबईहून रेल्वे किंवा बसने थेट राजस्थानला जाऊ शकले असते; पण पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी पुण्याचा मार्ग निवडला. सीसीटीव्हीमध्ये आरोपी पुणे बसस्थानकात उतरताना दिसत आहेत. मात्र, पोलिसांना आणखी काही सुगावा लागला नाही. पोलिसांच्या पथकाने धोबी तलाव परिसरातील लॉजचा शोध सुरू केला होता, जिथे आरोपी घटनेपूर्वी राहत होते. आरोपींनी लॉजमध्ये चुकीचा पत्ता दिला होता. पण, मोबाईल नंबर बरोबर लिहिला होता. दरोडा टाकल्यानंतर आरोपीने त्याचा नंबर बंद केला होता.

 

पोलिसांनी तपासले बँकेचे तपशील: आरोपी पुण्याहून इंदूरला न जाता रतलामला पोहोचला होता. तेव्हा त्याने वृद्ध जोडप्याच्या कुटुंबातील एक नातेवाईक आणि टिप देणारा नोकर सुमित तटवाल याला 20 हजार रुपयांचा आणि राजस्थानमधील पत्नीला 2 हजार रुपये बँकेद्वारे पैसे पाठवून व्यवहार केला. पोलिसांनी ताबडतोब बँकेचे तपशील काढले आणि एक पथक आरोपीच्या राजस्थान (झालावार) येथील घरी पोहोचले. त्यावेळी आरोपी तेथे पोहोचताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. येथे पोलिसांनी मुंबईतील अग्रवाल कुटुंबाचा नातेवाईक आणि नोकर सुमित तटवाल याला ताब्यात घेतले. त्याने संपूर्ण दरोड्याचा कट आखला होता आणि त्यानेच आरोपींना राजस्थानमधून बोलावले होते.

 

 

आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा: ताडदेवचे वरिष्ठ निरीक्षक विवेक शेंडे यांनी सांगितले की, आरोपी सुरेंद्र सिंग झाला हा सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. तर राजाराम मेघवाल हा एका बँकेत व्यवस्थापक म्हणून काम करतो. त्याचप्रमाणे टिपर आरोपी सुमित तटवाल हा अग्रवाल कुटुंबातील मोठ्या सुनेचा चुलत भाऊ आहे. दोघांनी मिळून सुमारे २ कोटींचे सोने आणि हिरे लुटले होते. जो ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *