रेल्वेत पत्नीला धक्का लागल्याने संतापला पती; इतकं भयंकर कृत्य केलं की पाहून पोलिसही हादरले

0
310
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

मुंबईत पत्नीला धक्का लागल्याने रागाच्या भरात दाम्पत्याने एका तरुणाला मारहाण केली. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. या मारहाणीत तरुण रेल्वे मार्गावर पडल्याने रेल्वेच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला आहे.दिनेश राठोड असे मृत व्यक्तीचे नाव असून तो नवी मुंबईतील घणसोली गावातील रहिवासी आहे. या प्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी अविनाश माने आणि शीतल अविनाश माने या दाम्पत्याला अटक केली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

 

हे दांपत्य शिव रेल्वे स्थानकात जिन्यावरून उतरत होते. यावेळी प्रवासी दिनेश राठोड याचा धक्का शीतल माने यांना लागला. यानंतर बाचाबाची झाली आणि हा प्रकार वाढतच गेला. महिलेने प्रवाशाला छत्रीने मारले. अविनाश यांनी देखील त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. या झटापटीत प्रवाशाचा तोल गेल्याने तो रुळांवर पडला.

 

यावेळी लोकलच्या धडकेत त्या तरुणाचा मृत्यू झाला. यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. दोघही कोल्हापूरमधील रहिवासी आहेत. मारहाणीनंतर रेल्वे अपघात मृत्यू झालेला तरुण बेस्टमध्ये कामाला होता. अपघात नेमका कसा झाला याबाबत पोलीस सीसीटीव्ही कॅमेरे चेक करत आहेत.

 

पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले आहे. याबाबत दादर रेल्वे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून अविनाश व शीतल दोघांनाही अटक केली आहे. या घटनेमुळे मृत तरुणाच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे.

 

याठिकाणी लाखो लोक रोज प्रवास करतात. यामुळे रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर गर्दी देखील असते. यामुळे अनेकदा अशा प्रकारच्या धक्कादायक घटना घडत असतात. यातूनच ही घटना घडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here