मनसे ठाणे जिल्ह्यातील लोकसभेच्या ३ जागा लढवणार! राज ठाकरे घेणार आढावा बैठका

0
55
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

ठाणे- २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकांच्या सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्र नव निर्माण सेनाही आता निवडणुकांची तयारी करत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दौरा सुरू केला आहे.आज ठाकरे ठाणे दौऱ्यावर आले आहेत.

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर आले आहेत. आज ठाकरे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक घेणार आहेत. महाराष्ट्र नव निर्माण सेना ठाणे जिल्ह्यातील तीन आणि पालघरमधील एक जागा लढवणार आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यासाठी आज राज ठाकरे आज पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

 

ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात राज ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू आहे. या बैठकीत येणाऱ्या निवडणुकांसदर्भात चर्चा सुरू असून पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे. ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश देण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबत अमित ठाकरे ,आमदार राजू पाटील, अभिजीत पानसे अविनाश जाधव मनसे नेते उपस्थित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here