ताज्या बातम्या

भाजपला पराभूत करण्यासाठी तयारीला लागा – • उद्धव ठाकरे


मुंबई : उमेदवार कोण आहे हे महत्त्वाचे नाही. आपल्याला सर्व ताकदीनिशी भाजपला हरवायचे आहे. भाजपच्या विरोधात देशात तयार झालेल्या इंडिया आघाडीसोबत आपण आहोत. त्यामुळे आजपासून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असा संदेश शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मातोश्री निवासस्थानी उत्तर महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना दिला.

राज्याची सत्ता काबीज करण्यासाठी चार वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन प्रमुख पक्षांच्या आघाडीत बिघाडी निर्माण होऊ लागल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाने स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ‘मातोश्री’ निवासस्थानी लोकसभा मतदारसंघातील आमदार, खासदार, माजी आमदार, संपर्क प्रमुख, उपनेते आणि जिल्हा प्रमुख अशा तीस प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकांना सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात १६ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जात असून हा आढावा शनिवापर्यंत चालणार आहे. बुधवारी नंदुरबार, धुळे, जळगाव, रावेर या उत्तर महाराष्ट्रातील चार मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात बैठक झाल्यापासून महाविकास आघाडीत संभ्रम आहे. आघाडीत फूट पडण्याची शक्यता लक्षात घेऊन शिवसेना व काँग्रेस यांनी स्वबळाच्या चाचपणीला सुरुवात केली आहे. आघाडीत बिघाडी निर्माण झाल्यास ४८ लोकसभा मतदारसंघांत निवडणूक लढण्याची तयारी ठेवण्यास कार्यकर्त्यांना सूचना दिल्या गेल्या आहेत. नंदुरबार मतदारसंघाची चाचपणी या वेळी झाली. या ठिकाणी भाजपच्या खासदार डॉ. हिना गावित आहेत. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या पाठिंब्यावर धुळे, जळगाव, रावेर मतदारसंघांत भाजपचे खासदार आहेत. भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भाजपविरोधात एक उमेदवार

राज्यात एकास एक उमेदवार दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीला आणखी नऊ महिने आहेत. या नऊ महिन्यांत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याचे आदेश ठाकरे यांनी दिले आहेत. यानंतर नाशिक, नगर, दिंडोरी, मावळ, शिरुर, बारामती, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, हातकंणगले अशा ११ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *