ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर शिंदे गटात प्रंचड अस्वस्थता पसरली. महाविकास आघाडी सरकार काळात निधीवाटपावरून शिंदे गटाने शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारलंपरंतु महायुतीच्या सरकारमध्येही अजित पवारांना अर्थखातं दिल्यानंतर शिंदे गटात मोठ्या कुरबुजी सुरू झाल्या. यातच महायुतीत मागील काही दिवसापासून आलबेल नसल्याचं चित्र दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता महायुतीत सर्व काही आलबेल असल्याचं दाखवण्यासाठी स्नेहभाोजनाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीगाठी आणि महायुतीतील हालचाली यामुळे सरकारमध्ये अस्वस्थता दिसून आली आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक साताऱ्यात आपल्या मुळ गावी तब्बल चार दिवस सुट्टीवर गेल्याने राजकीय तर्कवितर्क काढू लागले आहेत. यातच शरद पवार-अजित पवार यांच्या भेटीगाठी अन् अजित पवारांना मुख्यमंत्रीपद यामुळे सरकारमध्ये खुप मोठ्या हालचाली सुरू झाल्याचं दिसून येत आहे.
Home ताज्या बातम्या सरकारमध्ये अस्वस्थता.., मुख्यमंत्र्यांने ठेवलं स्नेहभोजन, ‘या’ मंत्र्यांना दिलं आमंत्रण”