ताज्या बातम्या

अमित शाहांनी संसदेत मुर्खपणा केला, एवढ्या मोठ्या 11 नेत्यांनी.”, बच्चू कडू असं का बोलले?


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी ( ९ ऑगस्ट ) मारेगाव तालुक्यातील कलावती बांदूरकर या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलेला घर, वीज, शौचालय, आरोग्य या सुविधा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या, असे ठामपणे सांगून राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला होता.

या प्रकारानंतर कलावती बांदूरकर यांनी अमित शहा यांचा दावा खोडून काढत आपल्याला राहुल गांधी यांच्यामुळेच सर्व मदत मिळाल्याचे सांगत केंद्र सरकारला खोटे ठरवलं होतं. याप्रकरणावर आमदार बच्चू कडू यांनी भाष्य केलं आहे.

“अमित शाहांसारख्या मोठ्या नेत्यांनी विचारपूर्वक वक्तव्य करण्याची गरज आहे. यामुळे भाजपा पक्ष अडचणीत येतो,” असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा :मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

“पहिल्यांदा राहुल गांधींनी मुर्खपणा केला. कलावती यांना घर बांधून देणं ही विटंबना होती. सामान्य लोकांचा छळ करण्यासारखं ते होतं. तुमचं सरकार असताना धोरण आखलं पाहिजे होतं. फक्त कलावती यांच्या घरी जाऊन वीज, घर द्यायचं, हे तर डिवचण्यासारखी पद्धत होती. करोडो लोक रांगेत उभी असताना एखाद्यासाठी उदार व्हायचं आणि बाकीच्यांच्या हाती भोपळा द्यायचा,” अशी संतप्त प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

“आता त्यापेक्षा मोठा मुर्खपणा अमित शाहांनी संसदेत केला. अमित शाहांनी संसदेत कलावती यांना वीज, घर दिल्याचं सांगितलं. पण, ‘जे काही दिलं, ते काँग्रेसने दिलं,’ असं कलवती यांनी म्हटलं आहे. एवढ्या मोठ्या नेत्यांनी खोटं बोलताना थोडं विचार करण्याची गरज होती. त्यामुळे भाजपा पक्षाच्या अडचणीत वाढ होते. प्रत्येक गोष्टीत हे खोटं बोलतात, असा प्रचार झाला आहे. विरोधकांना नवीन संधी अमित शाहांनी दिली आहे,” असं बच्चू कडू म्हणाले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *