ध्वजारोहण सोहळ्याच्या यादीत बदल, चंद्रकांत पाटील यांच्याकडे नवी जबाबदारी

0
97
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधीपुणे 11 ऑगस्ट : राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सामील झाल्यानंतर नव्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर झालं. पण अजूनही पालकमंत्र्यांची यादी रखडलेली आहे.

अशातच स्वातंत्र्य दिनासाठी झेंडावंदन करण्यासाठी मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पण या यादीत आता बदल कऱण्यात आला आहे. पुण्यात राज्यपालांच्या हस्तेच झेंडावंदन होणार आहे. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर रायगडची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.15 ऑगस्टला देशाचा 76 वा वर्धापन दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.

राज्यातही स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रत्येक जिल्ह्यांमध्ये त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री झेंडावंदन करत असतात. पण अद्याप पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. महाराष्ट्रात सध्या तीन पक्षांचं सरकार आहे. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात कोण झेंडावंदन करणार?

असा प्रश्न निर्माण झाला होता. गुरुवारी राज्य सरकारकडून एक यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.(सचिन तेंडुलकरविरोधात बच्चू कडू आक्रमक; थेट न्यायालयात जाण्याचा इशारा, प्रकरण काय?)या यादीत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असा उल्लेख होता. मात्र, पुण्यात इंग्रज काळापासून विधानभवन असल्या कारणामुळे प्रथेप्रमाणे दरवर्षी 15 ऑगस्टला राज्यपालच ध्वजारोहण करतात. पालकमंत्री यावेळी हजर असतात.

त्यामुळे नव्याने यादी दुरस्ती करण्यात आली आहे. आता चंद्रकांत पाटील यांच्यावर रायगडमध्ये ध्वजारोहण सोहळ्याला हजर राहणार आहे.(नितीन देसाई प्रकरणी आरोपींना न्यायालयाचा दणका, दिलासा देण्यास स्पष्ट नकार)दरम्यान, पालकमंत्रिपदाचा वाद टाळण्यासाठी तात्पुरती ध्वजारोहणाची यादी राज्य सरकारनं जाहीर केली आहे. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे नाशिकऐवजी धुळे इथं ध्वजावंदन करणार आहेत. तर, नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या हस्ते झेंडावंदन होणार आहे. कोल्हापूर येथे अजित पवार झेंडावंदन करतील.कोण कुठे करणार झेंडावंदन ?देवेंद्र फडणवीस – नागपूरअजित पवार – कोल्हापूरछगन भुजबळ – अमरावतीसुधीर मुनगंटीवार – चंद्रपूरचंद्रकांत पाटील – रायगडदिलीप वळसे पाटील – वाशिमराधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगरगिरीश महाजन – नाशिकदादा भुसे – धुळेगुलाबराव पाटील – जळगावरवींद्र चव्हाण – ठाणेहसन मुश्रीफ – सोलापूरदीपक केसरकर – सिंधुदुर्गउदय सामंत – रत्नागिरीअतुल सावे – परभणीसंदीपान भुमरे – औरंगाबादसुरेश खाडे – सांगलीविजयकुमार गावित – नंदुरबारतानाजी सावंत – उस्मानाबादशंभूराज देसाई – साताराअब्दुल सत्तार – जालनासंजय राठोड – यवतमाळधनंजय मुंडे – बीडधर्मराव आत्राम – गडचिरोलीमंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगरसंजय बनसोडे – लातूरअनिल पाटील – बुलढाणाआदिती तटकरे – पालघर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here