टायगर श्रॉफ करतोय नव्या ‘दिशा’ ला डेट? म्हणाला ‘आम्ही 2 वर्षांपासून..’

0
49
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) हा गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या डेटिंग लाइफमुळे चर्चेत असतो. त्याचं आणि अभिनेत्री दिशा पटानीचं (Disha Patani) ब्रेकअप झाल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत.

त्यानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली होती की त्या दिशाशी ब्रेकअप केल्यानंतर टायगरच्या आयुष्यात एक नवी दिशा आली आहे. टायगर आता दीशा धानुकासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, टायगरनं त्याच्या रिलेशनशिप स्टेटसविषयी सांगितल्याचं म्हटलं जात आहे.

बॉम्बे टाइम्सच्या रिपोर्ट्सनुसार, टायगर श्रॉफ हा दीशा धानुकाला डेट करत आहे. एका वृत्तावाहिनीनं दिलेल्या माहितीनुसार, ती एका प्रोडक्शन हाऊसमध्ये सीनियर पोजिशनला काम करते. त्यासोबतच ती टायगरला चांगली स्क्रिप्ट शोधण्यास देखील मदत करते. रिपोर्ट्समध्ये असे देखील म्हटले जात आहे की टायगर दिशा पटानीसोबत ब्रेकअपनंतर दीशा धानुकासोबत रिलेशनशिपमध्ये आला. गेल्या दीड वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दीशा त्याला स्क्रिप्टसाठी सजेशन देते. तर तो तिला फिटनेसमध्ये मदत करतो. त्यांच्या रिलेशनशिपविषयी सगळ्यांना माहित आहे असं म्हटलं जाते.

दरम्यान, ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत टायगर श्रॉफ म्हणाला, तो सिंगल आहे. मला असं वाटतं की एक-दोन महिन्यांपूर्वी माझं नाव दुसऱ्या कोणाशी जोडण्यात आलं होतं. पण नाही. गेल्या दोन वर्षांपासून मी सिंगल आहे. दुसरीकडे दीशानं तिच्या आणि टायगरच्या रिलेशनशिपवर वक्तव्य केलेलं नाही.

हेही वाचा : ‘जेलर’चा नेगेटिव्ह रिव्ह्यू देणाऱ्यांवर रजनीकांत यांच्या चाहत्यांचा संताप, दोघांना बेदम मारहाण

टायगर आणि दिशा पटानी यांच्या रिलेशनशिपविषयी बोलायचे झाले तर, गेल्या वर्षी त्यांचं ब्रेकअप झाल्याचे म्हटले जाते. त्याचं कारण टायगरला लग्न करायचं नव्हतं हे असल्याचं म्हटले जाते. 2022 मध्ये दिशानं टायगरला सांगितलं की त्या दोघांनी आता लग्न करायला हवे पण टायगरला इतक्यात लग्न करायचं नसल्यानं त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण या सगळ्यांवर त्या दोघांनी किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तीनं कोणतीही माहिती दिली नाही. दरम्यान, सध्या दिशा ही Aleksandar Alex Ilic याच्या सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जाते. दिशा आणि टायगरनं ‘बागी 2’ मध्ये एकत्र काम केले होते. तर दिशा टायगरच्या जीममध्येच फिटनेस ट्रेनिंग ही करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here