ध्वजारोहणावरुन मंत्र्यांमध्ये नाराजी ? कोल्हापूरला जाण्यावरुन अजित पवार नाराज, भुसे, भूजबळही अनुकूल नाहीत?

spot_img

15 ऑगस्टला ध्वजारोहण करण्यासाठी मंत्र्यांची काढलेली ऑर्डर पुन्हा बदलण्याची शक्यता आहे. कोल्हापुर इथं अजित पवार (Ajit Pawar) ध्वजारोहणाला जाण्यावरुन नाराज असल्याची माहिती आहे.

तर दादा भुसे (Dada Bhuse) नाशिकचे पालकमंत्री असताना धुळे झेंडावंदन करण्याची ऑर्डर काढल्याने नाराज आहेत.. दुसरीकडे अमरावतीत भुजबळ जाण्यावरून फार अनुकूल नाही अशी माहिती सूत्रांनी दिलीय. दादा भुसेंनी सीएम शिंदेंकडे (CM Eknath Shinde) नाराजी कळवल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे पुन्हा ध्वजारोहणासाठी ऑर्डर काढण्याची शक्यता आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील पुण्याऐवजी रायगडला ध्वजारोहण करणार आहेत. तर पुण्यात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहेत. दरम्यान ठरलेल्या ठिकाणी मंत्री ध्वजारोहण करतील अशी प्रतिक्रिया सुनील तटकरेंनी दिलीय…

कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री करणार ध्वजारोहण?

देवेंद्र फडणवीस – नागपूर
अजित पवार – कोल्हापूर
छगन भुजबळ – अमरावती
सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर
चंद्रकांत पाटील – पुणे
दिलीप वळसे पाटील – वाशिम
राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर
गिरीश महाजन – नाशिक
दादा भुसे – धुळे
गुलाबराव पाटील – जळगाव
रविंद्र चव्हाण – ठाणे
हसन मुश्रीफ – सोलापूर
दीपक केसरकर – सिंधुदुर्ग
उदय सामंत – रत्नागिरी
अतुल सावे – परभणी
संदीपान भुमरे – औरंगाबाद
सुरेश खाडे – सांगली
विजयकुमार गावित – नंदुरबार
तानाजी सावंत – उस्मानाबाद
शंभूराज देसाई – सातारा
अब्दुल सत्तार – जालना
संजय राठोड – यवतमाळ
धनंजय मुंडे – बीड
धर्मराव आत्राम – गडचिरोली
मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर
संजय बनसोडे – लातूर
अनिल पाटील – बुलढाणा
आदिती तटकरे – पालघर

शिंदे-पवारांमध्ये कोल्डवॉर?
मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या ‘वॉररूम’वरून कोल्ड वॉर सुरू झालाय. खात्याचा संबंध नसताना वॉररुमध्ये अजित पवारांकडून आढावा घेण्यात आलाय. त्यामुळे हे कोल्डवॉर कुठल्या दिशेने जाईल हे लवकरच दिसेल असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी महायुतीवर केलाय. तर तिन्ही पक्ष राज्याच्या विकासासाठी काम करत असल्याचं सांगत राहुल शेवाळेंनी वडेट्टीवारांचे आरोप फेटाळलेयत. तर कुठलंही कोल्ड वॉर नसल्याचं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी म्हटलंय.

राष्ट्रवादीची नवी रणनिती
आगामी निवडणुकांसाठी अजित पवारांकडून तयारी सुरू झालीय. संघटनात्मक बांधणीसाठी अजित पवारांनी आज आमदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीसाठी दिलीप वळसे पाटील, झिरवाळ, तटकरे, मिटकरींसह अनेक आमदार उपस्थित होते. यावेळी बैठकीत जिल्ह्या जिल्ह्यात दौरे कसे करायचे याबाबत चर्चा झाली. तसेच राष्ट्रवादीचे 9 मंत्री जनता दरबार भरवणार असल्याची माहिती तटकरेंनी दिलीय…

Related Articles

Latest Articles

महाराष्ट्र न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img
spot_img

लोकशाही न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img

लग्नाचं आमिष देत,मुलीवरच 13 वर्षं बलात्कार; हा प्रसिद्ध अभिनेता कोण ?

छत्तीसगड पोलिसांनी बलात्कार आणि अनैसर्गिक सेक्स केल्याच्या आरोपाखाली अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक मनोज राजपूतला अटक केली आहे. मनोज राजपूतवर आपल्याच एका जवळच्या नातेवाईकावर लग्नाचं...

भगवान शंकराचे स्तंभेश्वर मंदिर,दिवसातून दोनदा गायब होतं महादेवाचे ‘हे’ मंदिर

भारतीय हिंदू संस्कृतीत मंदिराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंदिर हे देवाचे स्थान आहे. भारतात फक्त पूजा-अर्चनाच नाही तर इतरही धार्मिक कार्ये केला जातात. भारतातील अशी अनेक...

‘सीता’ सिंहिण ‘अकबर’ सिंह नावावरण वाद, हायकोर्टाने दिला मोठा निर्णय..

पश्चिम बंगालमधल्या (West Bengal) एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि सिंहिणीला देण्यात आलेल्या नावावरुन मोठा वाद उभा राहिला आहे. हे प्रकरण कोलकाता हायकोर्टापर्यंत पोहोचलं आहे. हायकोर्टाने...

अकॅडमीच्या संचालकने ‘तू काळी आहेस’ म्हणून हिणवले, तरुणीने संपवलं जीवन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, वाळूज भागातील बजाजनगरातील गरुडझेप अकॅडमीत पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या एका 19 वर्षांच्या...

हुक्का बारवर बंदी विधेयकास मंजुरी; सिगारेट विक्रीवरही राहणार बंदी; दंडासह तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास

राज्याने २१ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. बंगळूर : कर्नाटक सरकारने (Karnataka Government) बुधवारी राज्यभरात हुक्का बारवर...