19.1 C
New York
Sunday, May 26, 2024

Buy now

Gadar 2 : पहिल्याच दिवशी ‘गदर २’ करणार दमदार कलेक्शन! पहिल्याच दिवशी मोडणार ‘पठान’चा रेकॉर्ड?

- Advertisement -
 • ‘गदर २’ (Gadar 2)रिलीजसाठी सज्ज आहे आणि ११ ऑगस्टला पडद्यावर येणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करेल अशी निर्मात्यांसह सर्वांना आशा आहे. चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजपासून ते अ‍ॅडव्हान्स बुकिंगपर्यंत ‘गदर २’चा जलवा पाहायला मिळत आहे.९ ऑगस्टच्या रात्रीपर्यंत ‘गदर २’साठी ३,९१,९७५ तिकिटांची आगाऊ बुकिंग झाली आहे आणि अशा परिस्थितीत निर्माते चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या कलेक्शनची वाट पाहत आहेत.

  ‘गदर २’ ची अ‍ॅडव्हान्स बुकिंग ‘ब्रह्मास्त्र’ला स्पर्धा देत आहे आणि ‘पठाण’ नंतरचा या वर्षातील दुसरा सर्वाधिक अ‍ॅडव्हान्स बुकिंग करणारा चित्रपट ठरला आहे. अशा परिस्थितीत, बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, गदर २ पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ३० कोटी ते ३५ कोटींची कमाई करू शकते, असे बोलले जात आहे. त्याच वेळी, काही रिपोर्टमध्ये, सुरुवातीच्या दिवशी ४०-४५ कोटी रुपयांच्या निव्वळ संकलनाचा अंदाज आहे. जे रेकॉर्ड ब्रेकिंग कलेक्शन असेल.

  - Advertisement -

  पहिल्याच दिवशी चित्रपट कमावणार इतके कोटी!
  विशेष म्हणजे ‘गदर २’ सोबतच अक्षय कुमारचा ‘OMG 2’ देखील ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. अशा स्थितीत दोन्ही चित्रपटांमध्ये स्पर्धा होणार आहे. आगाऊ बुकिंगमध्ये ‘OMG 2’ सनी देओलच्या चित्रपटापेक्षा खूपच मागे असला तरी. नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार, ‘गदर २’ने पहिल्या दिवशी ४०-४५ कोटी रुपयांपर्यंत कमाई केली तर पहिल्या वीकेंडपर्यंत हा चित्रपट १००-११० कोटींचा आकडा पार करेल.

  - Advertisement -

  ‘गदर २’ ३५०० हून अधिक स्क्रीन्सवर रिलीज होणार आहे
  यावेळी उत्कर्ष शर्मा आणि सिमरत कौर देखील सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर चित्रपटात दिसणार आहेत. ‘गदर २’ हा सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या २००१ मध्ये आलेल्या ‘गदर एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे, जो सर्वकालीन ब्लॉकबस्टर ठरला आहे. ११ ऑगस्ट रोजी ‘गदर २’ देशभरातील ३५०० हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles