सांगली जिल्हा बद्दलची माहिती

0
88
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

सांगली जिल्हा

प्राचीन काळापासून या प्रदेशावर मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, चालुक्य, यादव, बहामनी आणि मराठी सत्तेचा अंमल होता. पेशव्यांच्या राजवटीत सांगली शहर पटवर्धन संस्थानची राजधानी होते. १ ऑगस्ट १९४९ रोजी त्यावेळेसच्या सातारा जिल्ह्याचे विभाजन करून उत्तर सातारा आणि दक्षिण सातारा असे दोन जिल्हे निर्माण करण्यात आले. यापैकी दक्षिण सातारा या जिल्ह्याचे २१ नोव्हेंबर १९६० सांगली असे नामांतर करण्यात आले.

सांगली जिल्हा संक्षिप्त माहिती

१. भौगोलिक स्थान : सांगली जिल्ह्याच्या उत्तरेला व वायव्येला सातारा, उत्तर व ईशान्येला सोलापूर, पूर्वेला विजापूर (कर्नाटक), दक्षिणेला बेळगाव (कर्नाटक), नैऋत्येला कोल्हापूर व पश्चिमेला रत्नागिरी हे जिल्हे आहेत. पश्चिमेकडील शिराळा तालुका सह्याद्रीच्या मुख्य रांगेत येतो. जिल्ह्याचा पश्चिम भाग डोंगराळ आहे. कृष्णा खोऱ्याचा परिसर मात्र सपाट मैदानी स्वरूपाचा आहे.

२. प्रमुख पिके : ज्वारी हे या जिल्ह्यातील प्रमुख पीक असून येथे घेतली जाणारी मालदांडी ही ज्वारीची जात विशेष प्रचलित आहे. सांगलीची हळद प्रसिद्ध आहे. उसाचे पीकदेखील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घेतले जात. अलीकडील काळात सांगली जिल्हा द्राक्षोत्पादनासाठी प्रसिद्धीस आला असून, तासगाव तालुका द्राक्ष उत्पादनात जिल्ह्यात अग्रेसर आहे. तालुक्याच्या काही भागांत तंबाखूचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते.

३. नद्या व धरणे : सांगली जिल्ह्यातील कृष्णा ही प्रमुख नदी असून, वारणा, मोरणा, येरला, अग्रणी, मणी, मान, कोरडा, बोर, पाटणा या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. या जिल्ह्यात वारणा नदीवर चांदोली धरण आणि खानापूर तालुक्यात येरळा नदीवर बळीराजा धरण बांधण्यात आले आहे.

४. खनिज संपत्ती : सांगली जिल्ह्यात बॉक्साइटचे साठे आहेत.

५. उद्योग व व्यवसाय : या जिल्ह्यात सांगली, मिरज, विटा, कवठे-महांकाळ व इस्लामपूर या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. सांगली येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना हा आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना आहे. मिरज हे प्रामुख्याने तंतूवाद्यांसाठी प्रसिद्ध असून, येथील सतार, तंबोरा, सारंगी, वीणा घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लोक येतात. सांगली येथील हळद व गुळाची बाजारपेठ प्रसिद्ध आहे.

६. दळणवळण : या जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ रत्नागिरी जिल्ह्यातून नागपूरला जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.२०४ गेला आहे. सांगली जिल्ह्यातून पुणे कोल्हापूर रेल्वेमार्ग गेला आहे व मिरज-कुडुवाडी-लातूर हे लोहमार्ग जातात. सांगली जिल्ह्यातील मिरज हे महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे.

सांगली जिल्ह्याची वैशिष्ट्ये

  • देवराष्ट्र हे गाव कडेगाव तालुक्यात असून, येथील सागरेश्वर अभयारण्य प्रसिद्ध आहे.
  • कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेली रयत शिक्षण संस्था सांगली येथे आहे.
  • विष्णुदास भावे हे मराठी नाटकाचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांनी सन १८४३ मध्ये सांगली येथे मराठी नाटक सादर करण्यास प्रारंभ केला.
  • सांगली जिल्हा हा कलावंतांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.
  • भारतीय सर्कसचे जनक विष्णूपंत छत्रे हे मूळचे सांगलीचे होते.

सांख्यिकीक सांगली

(अ) भौगोलिक माहिती

१. क्षेत्रफळ=८,५७८ चौ.किमी.

२. जंगलाचे प्रमाण=४.९%

३. अभयारण्ये =सागरेश्वर अभयारण्य

४. राष्ट्रीय उद्याने = चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा काही भाग या जिल्ह्यात येतो.

५. वनोद्याने =दंडोबा डोंगर

(आ) प्रशासकीय माहिती

१. आयुक्तालय=पुणे विभाग (पुणे)

२.जिल्ह्याचे मुख्यालय=सांगली

३.उपविभाग=०५ विटा, मिरज, जत, वाळवा व कडेगाव.

४. तालुके=१० खानापूर, कवठे महाकाळ, वाळवा, तासगाव, जत, शिराळा, आटपाडी, पलूस, मिरज, कडेगाव.

५. पंचायत समित्या=१०

६. ग्रामपंचायत=६९९

७.महानगरपालिका=०१ मिरजकुपवाड महानगरपालिका

८. नगरपालिका= ०६

९. नगरपंचायत =०४

१०. पोलीस मुख्यालय=०१ जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक

११. पोलीस स्टेशनची संख्या= २४

(इ) लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनुसार)

१. लोकसंख्या =२८,२२,१४३

२. साक्षरता= ८१.४८%

३. लिंग गुणोत्तर =९६४

४. लोकसंख्येची घनता= ३३०

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here