‘ या. तारखेला अजित पवार मुख्यमंत्री होतील”; काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा

spot_img

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. अलीकडेच अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केली आणि शिंदे-फडणवीसांच्या सत्तेत सामील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याचा पदभार देण्यात आला. यातच आता अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याचे दावे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील आमदार करताना पाहायला मिळत आहे. यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार केव्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, याची तारीखच सांगितली आहे.

 

अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यावरच सांगितले होते की, ते लवकरच मुख्यमंत्री बनतील. हे सांगणारा मी पहिला व्यक्ती होतो. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघे एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम करतील, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. तर, अजित पवार यांचे खंदे समर्थक असलेले आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्रामध्ये लवकरच अजित पर्व सुरू होईल, असे ट्विट केले होते. यानंतर आता यासंदर्भात पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केला आहे

. झाले.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार की नाही, हे यावरून ठरणार आहे. एकनाथ शिंदे यांचा ठाण्याबाहेर फारसा प्रभाव नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक लढवण्यास भाजप नेतृत्व तयार नाही. अजित पवार यांना सामावून घेतले आहे, त्यांनाच जबाबदारी देण्यात येऊ शकते, असा दावा करताना १० ऑगस्टपर्यंत विधानसभा अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या अपात्रतेचा निर्णय देऊ शकतील. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरतील. त्यानंतर रिक्त झालेल्या मुख्यमंत्रीपदावर अजित पवार यांची वर्णी लागू शकते, असे आकलन पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलून दाखवले.

 

दरम्यान, अजित पवार यांची भाजपला गरज आहे. वापरा आणि फेकून द्या, अशी नरेंद्र मोदी यांची स्टाइल आहे. त्यानुसार एकनाथ शिंदे यांचा वापर झालेला आहे. त्यांची उपयुक्तता संपलेली आहे. आता कोण उपयुक्त आहे, ते भाजपवाले ठरवतील, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले

Related Articles

Latest Articles

महाराष्ट्र न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img
spot_img

लोकशाही न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img

लग्नाचं आमिष देत,मुलीवरच 13 वर्षं बलात्कार; हा प्रसिद्ध अभिनेता कोण ?

छत्तीसगड पोलिसांनी बलात्कार आणि अनैसर्गिक सेक्स केल्याच्या आरोपाखाली अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक मनोज राजपूतला अटक केली आहे. मनोज राजपूतवर आपल्याच एका जवळच्या नातेवाईकावर लग्नाचं...

भगवान शंकराचे स्तंभेश्वर मंदिर,दिवसातून दोनदा गायब होतं महादेवाचे ‘हे’ मंदिर

भारतीय हिंदू संस्कृतीत मंदिराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंदिर हे देवाचे स्थान आहे. भारतात फक्त पूजा-अर्चनाच नाही तर इतरही धार्मिक कार्ये केला जातात. भारतातील अशी अनेक...

‘सीता’ सिंहिण ‘अकबर’ सिंह नावावरण वाद, हायकोर्टाने दिला मोठा निर्णय..

पश्चिम बंगालमधल्या (West Bengal) एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि सिंहिणीला देण्यात आलेल्या नावावरुन मोठा वाद उभा राहिला आहे. हे प्रकरण कोलकाता हायकोर्टापर्यंत पोहोचलं आहे. हायकोर्टाने...

अकॅडमीच्या संचालकने ‘तू काळी आहेस’ म्हणून हिणवले, तरुणीने संपवलं जीवन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, वाळूज भागातील बजाजनगरातील गरुडझेप अकॅडमीत पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या एका 19 वर्षांच्या...

हुक्का बारवर बंदी विधेयकास मंजुरी; सिगारेट विक्रीवरही राहणार बंदी; दंडासह तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास

राज्याने २१ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. बंगळूर : कर्नाटक सरकारने (Karnataka Government) बुधवारी राज्यभरात हुक्का बारवर...