ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

शेतकऱ्यांना जादा पैसे मिळत आहेत ? काय आहे सत्य वाचा


काही दिवसांपूर्वीच टोमॅटोला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो बांधावर फेकल्याच्या तसेच बाजारात ओतल्याच्या आणि टोमॅटोच्या शेतावर ट्रॅक्टर फिरवल्याच्या बातम्या पाहिल्या वाचल्या आहेत.परंतु आज बाजारात याच्या अगदी उलट स्थिती आहे. सध्या बाजारात टोमॅटोला चांगला भाव मिळत आहे. परंतु याचा अर्थ असा अजिबात नाही की शेतकऱ्यांना जादा पैसे मिळत आहेत.

 

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन व्यापारी हा टोमॅटो कमी दराने विकत घेतात आणि बाजारात चढ्या दराने विकले जातात. हा नफा इतका असतो की ज्या शेतकऱ्याने ते पीक घेताना जितका खर्च आला त्यापेक्षा जास्त नफा व्यापारी कमावतात. म्हणजेच पिकवणारा शेतकरी बेहाल तर व्यापारी मालामाल झाल्याचे चित्र आहे.

 

सध्या महागाई झपाट्याने वाढत आहे. अगदी स्वयंपाक घरातील किराणापासून ते अत्यावश्यक सेवांपर्यंत सगळ्याच गोष्टी महाग झाल्या आहेत. राज्यात अनेक भागात पावसाने पूर आला तर तर दुसरीकडे मात्र अद्यापही अनेक भागात पेरण्या देखील झालेल्या नाहीत.

 

खरिपाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड थांबवली, त्यात उष्णतेचा तडाखा, मध्यंतरी झालेला अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळाने तडाखा दिल्याने उत्पादनावर परिणाम होऊन बाजारात भाजीपाल्याची आवक घटली. परिणामी हिरव्या पालेभाज्यांचे दर ६० ते ८० रुपये किलोवर पोहोचले आहेत.

 

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले दर (सर्व दर क्विंटलमध्ये ) : टोमॅटो २५०० – ८०००, वांगी १५०० – ४०००, फ्लावर १००० – ४०००, कोबी ५०० – १५००, काकडी ८०० – १५००, गवार ४५०० – ८०००, घोसाळे १५०० – ३५००, दोडका १५००-४५००, कारले २००० – ४२००, कैरी भेंडी १००० २०००- ३२००, – ४०००, वाल ४००० – ५०००, घेवडा ४००० – ५५००, बटाटे ८००० – २०५०, – लसूण ६५००-१४०००, हिरवी मिरची ३००० ५५००, शेवगा १८०० – ४५००, भू. शेंग २५०० – ३८००, लिंबू ६०० – १५००, आद्रक १०,००० – १४,५००, गाजर १८०० – २५००, दु. भोपळा ६०० १५००, शिमला मिरची – १५००-६०००, मेथी १४०० – २०००, कोथिंबीर १४०० १६००, पालक १००० – २०००, शेपू भाजी १००० २०००, – चुका १४०० – १६००, चवळी २५००-३०००.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *