हेल्दी लाईफसाठी के जीवनसत्व मोलाचं; कशातून मिळतं आणि फायदे जाणून घ्या

0
67
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

जीवनसत्त्व म्हटलं की आपल्याला लगेच एबीसीडी ध्यानात येते. या एबीसीडीच्या पुढेही जीवनसत्त्वाची गाडी जाते. पण त्याकडे आपलं बऱ्याचदा दुर्लक्ष होतं. आणि हे दुर्लक्ष अनेकदा आपल्या तब्येतीसाठी न परवडणारं ठरतं. अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देणारं ठरतं. ह्रदय ते मेंदू आणि रक्तापासून ते हाडांपर्यंत अशा सर्वांसाठी या जीवनसत्त्वाची गरज पडते.

जीवनसत्त्व के हे आपल्या चरबीमध्ये मिसळलेलं एक जीवनसत्त्व आहे. शरीरात चरबीच्या रुपाने आतडे आणि यकृतामध्ये या जीवनसत्त्वाचं वास्तव्य असते. हे जीवनसत्त्व आपल्या हाडांना फ्रॅक्चर होण्यापासून म्हणजेचं हाडं तुटण्यापासून आपला बचाव करतं.

या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे जखम झाल्यास अधिक वेगानं रक्तस्राव होतो आणि ऑस्टियोपोरोसिस हा आजार होण्याचा धोका संभवतो. तसंच के जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे नाक आणि हिरड्यांमधून रक्त येणं, जखमेतून अधिक रक्तस्राव, महिलांना मासिक पाळीच्या काळात अधिक ब्लीडिंग, लघवीतून रक्त येणं यासारखी लक्षणं आढळतात. त्यामुळेच आपण जीवनसत्त्व के आपल्या आरोग्यासाठी का गरजेचं आहेत ते बघूया.

या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे नाक आणि हिरड्यांमधून रक्त येणं, जखमेतून अधिक रक्तस्राव, महिलांना मासिक पाळीच्या काळात अधिक ब्लीडिंग, लघवीतून रक्त येणं यासारखी लक्षणं आढळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here