कोथांबीर उत्पादनातून शेतकरी झाला मालामाल; दीड महिन्यात कमावले तब्बल 12 लाख रुपये

0
142
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

सध्या भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. टोमॅटोमधून अनेक शेतकरी करोडपती झाले आहेत. आता टोमॅटोपाठोपाठ कोथिंबीरीचे  दर देखील गगनाला भिडले आहेत.

त्यामुळे कोथिंबीर उत्पादक शेतकरी आनंदात आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना पिकाला भाव नसल्याने मोठा तोटा सहन करावा लागतो मात्र जर पिकाला योग्य भाव मिळाला तर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होता.

कोथिंबीरीचे दर वाढल्याने सध्या बरेच शेतकरी चांगला नफा कमवत आहेत. सध्या नाशिकमधील एका कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्याची चर्चा होताना दिसत आहे. चर्चा होण्याचं कारण असं की, या शेतकऱ्याने कोथिंबीर पिकातून तब्बल साडेबारा लाख रुपये कमावले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्याची या सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे.

शेतकरी मित्रांनो कोथंबीरीचे भाव चेक करणे आता सोपे झाले आहे. आम्ही तुमच्यासाठी एक खास अँप बनविले आहे. Hello Krushi असं या अँपच नाव आहे. या अँपमध्ये तुम्ही रोजचा ताजा बाजारभाव चेक करू शकता. त्यामुळे लगेचच प्लेस्टोअरवर जाऊन आपले Hello Krushi हे अँप इंस्टाल करा. यामध्ये तुम्हाला सर्व माहिती अगदी मोफत वाचता येईल.

नाशिक जिल्ह्यामधील गोदाकाठ भागातील निफाड तालुक्याच्या तारुखेडले येथील एका शेतकऱ्याने कोथांबीर उत्पादनामधून बक्कळ पैसा कमावला आहे. युवराज एकनाथ जगताप असं या शेतकऱ्याचं नाव आहे. युवराज यांनी सहा एकर शेतीत कोथिंबीरची लागवड केली. त्यांना नशिबाने देखील साथ दिली त्यामुळे त्यांनी सहा एकरात तब्बल 12 लाख 51 हजार रुपये कमावले आहेत. फक्त दीड महिन्यात एवढे उत्पन्न मिळाल्यामुळे या शेतकऱ्याची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here