27.5 C
New York
Saturday, June 15, 2024

Buy now

पुणे रेल्वे स्टेशन येथील भुयारी मार्गात महिलेचा विनयभंग करून पतीला मारहाण

- Advertisement -

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन –  परगावाहून परत आल्यानंतर पुणे रेल्वे स्टेशन  येथील भुयारी मार्गातून जात असताना महिलेचा विनयभंग  करुन तिच्या पतीला मारहाण  करण्याचा प्रकार समोर आला आहेयाबाबत अरण्येश्वर येथे राहणार्‍या एका २३ वर्षाच्या महिलने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. २१३/२३) दिली आहे़ त्यानुसार पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती हे ९ जुलै रोजी पहाटे ४ वाजता महाराष्ट्र एक्सप्रेसने.  पुणे रेल्वे स्टेशनला उतरले. तेथून घरी जाण्यासाठी ते समोरील भुयारी मार्गातून जात असताना उतारावर त्यांच्या पतीचा पाय घसरल्याने ते खाली पडले. त्यांच्या पाठीमागून आलेल्या एका तरुणाने फिर्यादी यांच्या शरीरावरुन हात फिरवून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. फिर्यादीने त्याचा हात झटकला. फिर्यादीच्या पतीने त्याला जाब विचारल्यावर त्याने शिवीगाळ करुन त्यांना मारहाण करुन पळून गेला.

पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

पुणे रेल्वे स्टेशन येथील भुयारी मार्गात महिलेचा विनयभंग करून पतीला मारहाण  .

- Advertisement -

Related Articles

Latest Articles