25.8 C
New York
Saturday, June 15, 2024

Buy now

विदर्भात तूर ९ हजार ६०० रुपयांवर

- Advertisement -

तुरीच्या साठ्यावर मर्यादा घालून देण्यात आल्याने सध्या विदर्भातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर दबावात आले आहेत. परिणामी १० हजार रुपयांपेक्षा अधिक असलेले दर आता ९६०० रुपयांवर स्थिरावले आहेत.

- Advertisement -

यात येत्या काळात सुधारणा अपेक्षित नसल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगितले जात आहे.

- Advertisement -

नागपूरच्या कळमना बाजार समितीत तुरीची आवक २२३ क्‍विंटलवरुन कमी होत १२१ क्‍विंटलपर्यंत खाली आली आहे. गेल्या महिन्यापर्यंत तुरीच्या दराने दहा हजाराचा टप्पा पार केला होता.

या आठवड्यात तुरीचे व्यवहार ८८०० ते ९६१५ रुपयांनी होत आहेत. अमरावती बाजार समितीत तुरीला ९३०० ते ९६७२ असा दर मिळत आहे. तर ज्वारी २२०० ते २३५० रुपये, गहू २२०० ते २२५०, मूग ६३०० ते ७१५०, उडीद ५६००-६२५०, हरभरा ४५०० ते ४८५०, सोयाबीन ४७०० ते ४८५० रुपये क्‍विंटल होता.यवतमाळ, अमरावती आणि नागपूरच्या कळमना बाजार समितीत तिळाची आवक झाली. काही बाजार समित्यांमध्ये ती १५ ते २० क्‍विंटलच्या घरात आहे. कळमन्यात तिळाला १० हजार ते १० हजार ५०० रुपये असा दर मिळाला. अमरावतीत तिळाचे दर ११५०० ते १३,००० रुपये असे होते.यवतमाळला देखील १३ हजार ५०० ते १४ हजार ५०० रुपये असा दर होता. कारंजा (वाशीम) बाजार समितीत तिळाला सर्वाधिक १४ हजार ५१५ ते १४ हजार ७०० रुपये दर मिळाला. आवक मात्र अवघी १५ क्‍विंटलची होती. याच बाजारात सोयाबीनला ४५७५ ते ४८१० रुपयांचा दर मिळाला.

कारंजा बाजारात भुईमूग शेंगांची १७० क्‍विंटलची आवक झाली. ६४१० ते ६८९० रुपयांनी त्याचे व्यवहार झाले. यवतमाळ बाजार समितीत भुईमूगाला ६०८०-६९५५ असा दर होता. अमरावती बाजारात दाखल मक्‍याचे व्यवहार २००० ते २०७५ रुपयांनी झाले.

मोसंबीच्या दरात घसरण

कळमना बाजारात गेल्या आठवड्यात मोठ्या आकराच्या मोसंबी फळाला २५०० ते ३००० रुपयांचा दर होता. या आठवड्यात २००० ते २५०० या दराने मोसंबीचे व्यवहार झाले.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles