ताज्या बातम्या

या’ 4 जीवघेण्या आजारांचे मुळ आहे तंबाखू, दुस-या नंबरच्या आजाराने मरतात रोज लाखो लोक..!


तंबाखूचे सेवन आणि धूम्रपान यांचा शरीराच्या प्रत्येक अवयवावर परिणाम होतो. यामुळे अनेक रोग आणि गुंतागुंत होऊ शकतात, हे हृदयविकाराचे मुख्य कारण आहे. 2017 मध्ये भारतीय प्रौढ व्यक्तींवर केल्या गेलेल्या जागतिक सर्वेक्षणानुसार, भारतात सुमारे 267 दशलक्ष प्रौढ (15 वर्षांपेक्षा जास्त वयाचे) (एकूण प्रौढांपैकी 29 टक्के) तंबाखूचे सेवन करतात. देशाच्या लोकसंख्येच्या २८.६ टक्के म्हणजेच प्रत्येक 5 पैकी 1 व्यक्ती धूरविरहित तंबाखूचे सेवन करते. तर दर 10 पैकी 1 व्यक्ती धूम्रपान करतो, तंबाखूचे सेवन करणाऱ्यांपैकी 50 टक्के लोकांचा यामुळे मृत्यू होतो. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त (World No-Tobacco Day), डॉक्टर गुरमीत सिंग छाबरा (सीनियर कन्सलटन्ट, छाती आणि क्षयरोग तज्ञ, मरेंगो क्यूआरजी हॉस्पिटल) यांनी सांगितले की तंबाखूचे सेवन प्रत्येक स्वरूपात घातक आहे.

हुक्का, सिगार, बिडी, खैनी, गुटखा, सुपारी आणि जर्दा इत्यादी धूरविरहित तंबाखूजन्य पदार्थांच्या रूपात तंबाखूचा धूम्रपान केला जातो. धूम्रपान संपूर्ण कार्डियोवैस्कुलर सिस्टम म्हणजेच हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली प्रभावित करते ज्यात हृदय, रक्त आणि रक्तवाहिन्यांचा समावेश आहे. धूम्रपान हे कर्करोग आणि फुफ्फुसांचे आजार जसे की क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह फुफ्फुसाचे आजार, हृदयविकार, हार्ट स्ट्रोक, डायबिटीज, स्त्रियांमध्ये वांझपणा, कमी वजन, वेळेआधी प्रसूती, जन्मदोष आणि इरेक्टाइल डिसफंक्शन याचे मुख्य कारण आहे.
•कॅन्सरचा धोका:- सिगारेटमधील निकोटीन असल्यामुळे त्याच्या सेवनाने उच्च रक्तदाब (high blood pressure) होण्याची शक्यता वाढते. निकोटीन हे हानिकारक रसायन आहे, ज्यामुळे रक्तदाब वाढण्यासोबतच इतरही अनेक आजार होऊ शकतात. धूम्रपानामुळे रक्त, मूत्राशय, गर्भाशय, फुफ्फुस, लिव्हर, किडनी, ग्रसनी, स्वादुपिंड, तोंड, घसा, स्वरयंत्र, मूत्रपिंड, आतडे, गुदाशय, पोट यांचा कर्करोग होऊ शकतो. फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या 10 प्रकारांपैकी नऊ प्रकार धूम्रपानामुळे होतात. धूररहित तंबाखू चघळल्याने ग्रसनी, तोंडाचा आणि घशाचा कर्करोग होऊ शकतो. भारतात तोंडाच्या कर्करोगाची 90% प्रकरणे धूरविरहित तंबाखूमुळे होतात. कर्करोगाच्या तपासणीबद्दल बोलायचं तर छाती, गर्भाशयाच्या मुखाचा आणि कोलोरेक्टल कर्करोगाचे निदान लो डोस संगणकीय टोमोग्राफीद्वारे प्रारंभिक टप्प्यात केले जाऊ शकते. •ह्रदयरोगांचा धोका:-धूम्रपान हे हृदयविकाराचे मुख्य कारण आहे आणि सीवीडीमुळे होणा-या प्रत्येक चार मृत्यूपैकी एक मृत्यू यामुळेच होतो. धूम्रपानामुळे रक्तातील ट्रायग्लिसराइड्स वाढतात, त्यामुळे चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजेच एचडीएल कमी होते. त्यामुळे रक्त गोठण्याची शक्यता वाढते, अशाप्रकारे हृदय आणि मेंदूला रक्तप्रवाह नीट होऊ शकत नाही, रक्तवाहिन्यांमध्ये फॅट, कोलेस्ट्रॉल, कॅल्शियम इत्यादी स्वरूपात प्लाक जमा होऊ लागतात. त्यामुळे रक्तवाहिन्या जाड आणि अरुंद होतात. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि हार्ट स्ट्रोक होऊ शकतो. हाय ब्लड प्रेशर:-सिगारेट ओढल्याने उच्च रक्तदाब , एरिथमिया आणि एथेरोस्क्लेरोसिस होण्याची शक्यता वाढते. कालांतराने, या समस्या कोरोनरी आर्टरी रोग, हृदयविकाराचा झटका, हार्ट स्ट्रोक, हार्ट फेल्युअर व पेरिफरल आर्टरी रोग यांसारख्या गंभीर आजारांचे रूप घेतात. या आजारांपासून दूर राहण्यासाठी धूम्रपान न करणे कधीही चांगले. तुम्हाला धूम्रपान सोडायचे असल्यास डॉक्टरांची मदत घ्या. धूम्रपान सोडल्याने तुमचे हृदय आणि संपूर्ण शरीराचे आरोग्य सुधारेल. धुम्रपान न करणारे लोक जे घरी किंवा कामावर सेकंड हॅंड स्मोक मध्ये श्वास घेतात म्हणजेच दुसरी एखादी व्यक्ती आजुबाजूला स्मोक करत असताना त्यातून निघणारा धुर श्वासावाटे आत घेतात त्यांना हृदयविकाराचा धोका 25 ते 30% आणि हार्ट स्ट्रोकचा धोका 20 ते 30% असतो.म्हणून स्मोकिंग करणा-या लोकांच्या संपर्कातही राहू नये. श्वासांचे आजार:-सीओपीडी हा एक फुफ्फुसाचा आजार आहे ज्यामध्ये फुफ्फुसातील हवेचा प्रवाह कमी झाल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. सीओपीडीमध्ये एम्फिसीमा आणि क्रॉनिक ब्राँकायटिस यांचा समावेश होतो. सीओपीडीमध्ये, फुफ्फुसातील वायू कोशींच्या भिंती खराब होतात, ज्यामुळे श्वासनलिका कायमच्या अरुंद होतात. या नळ्यांमध्ये श्लेष्मा जमा झाल्यामुळे त्यांची जाडी वाढते. सीओपीडी हा सहसा धूम्रपानामुळे होतो. सीओपीडीमुळे 10 पैकी 8 मृत्यू धूम्रपानामुळे होतात. बालपण आणि पौगंडावस्थेमध्ये धूम्रपान केल्याने प्रौढ म्हणून सीओपीडीचा धोका वाढतो.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *