25.8 C
New York
Saturday, June 15, 2024

Buy now

पंकजा अस्वस्थ म्हणजे भाजपमध्ये अस्वस्थता!; एकनाथ खडसे पंकजा मुंडेंना भेटणार

- Advertisement -

पंकजा मुंडे यांचं विधान दुःखद आणि वेदनादायी आहे, असं एकनाथ खडसे म्हणालेत. गोपीनाथ मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी पक्षासाठी उभा आयुष्य घातलं. पंकजा मुंडे यांची अशी अवस्थता असणं म्हणजे भाजपमध्ये अस्वस्थता आहे.

- Advertisement -

भाजप पक्ष वर्षांवर्ष ज्यांनी वाढवला. बहुजनांपर्यंत पोहोचला. अशा जुन्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये छळ होतोय, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

- Advertisement -

एकनाथ खडसे आज पंकजा मुंडे यांना भेटणार आहेत. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त एकनाथ खडसे गोपीनाथ गडावर जाणार आहेत. याभेटीदरम्यान खडसे-मुंडे भेटीत राजकीय चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा होत आहेत. या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. एकनाथ खडसे यांच्या भेटीनंतर पंकजा मुंडे मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त एकनाथ खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. “महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री #गोपीनाथराव_मुंडे यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतींना विनम्र आदरांजली !”, असं खडसे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles