25.8 C
New York
Saturday, June 15, 2024

Buy now

नाशिक मध्ये लवजिहादच्या प्रकरणातून झाले अल्पवयीन मुलीचे अपहरण

- Advertisement -

नाशिक : जिल्हातुन लव जिहादचे एक खळबजनक प्रकरण समोर आले आहे. निफाड तालुक्यात राहणाऱ्या निकिता नावाच्या 18 वर्षीय हिंदू तरुणीवर तिच्या परिसरात किराणा दुकान चालवणारा रईस सय्यद नावाच्या विवाहित तरुणाला ती खूप आवडत होती.

- Advertisement -

त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. सय्यद एका मुलाचा बाप असूनही तिला सतत त्रास देत असे, धमकावत असे की जर तिने त्याच्याशी लग्न केले नाही, तर तो तिचे आयुष्य उद्ध्वस्त करेल, इतकेच नाही तर तो तिच्या आईला फोन व मॅसेज करून अशा अनेक धमक्या देत होता.

- Advertisement -

27 मे रोजी पीडित निकिता कॉम्प्युटर क्लासला जात असताना आरोपींनी बळजबरीने तिचे अपहरण केले. आरोपींनी निकिताचे अपहरण करून थेट अजमेरला नेले, तेथे दर्शन घेतल्यानंतर तिला तारागड दर्ग्यातही नेले.

त्यानंतर आरोपीने पुन्हा मुंबईसाठी दादरला जाणारी ट्रेन पकडली आणि मुंबईला पोहोचल्यानंतर तो अंबरनाथ, ठाणे येथे बहिणीच्या घरी गेला. जिथे अंबरनाथ पोलिसांनी रईस सय्यदला ताब्यात घेतले. त्यानंतर नाशिकचे निफाड पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.

पोलिसांनी निकिताला ताब्यात घेऊन कुटुंबीयांच्या ताब्यात दिले आणि गुरुवारी निफाड पोलिसांनी आरोपी रईसविरुद्ध एफआयआर नोंदवला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयपीसी कलम 363, 366, 354(डी), 506 आयपीसी, कलम 3(2)(व्ही), 3(2)(वा), कलम 12 आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles