आरोग्यताज्या बातम्या

रात्री झोपण्याआधी गुळ खा; मग बघा काय होईल कमाल.


गुळ खाणे सर्वाना आवडते कारण गुळात गर्मी जास्त असते. गुळ खाल्ल्याने शरीरात गर्मी वाढते. पोटाच्या सर्व विकारांवर गुळ अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी आहे. आयुर्वेदानुसार गुळातील तत्वांमुळे शरीरातील ऍसिड नाश पावते.

रोज गुळ खाल्ल्याने तुमचे स्वास्थ्य उत्तम राहते. आज आम्ही तुम्हाला गुळाचे असे फायदे सांगणार आहोत जे तुम्ही या आधी कधीच ऐकले नसतील.

जर तुम्ही लागोपाठ सात दिवस गुळ खाल्ला तर असा कमाल होईल कि तुम्ही याचा कधी विचारही नसेल केला. तुमच्या शरीरासाठी गुळ म्हणजे एका अमृता समान आहे. तुम्हाला सांगतो गुळ खूप साऱ्या रोगांवर उपयोगी पडतो. चला तर मग बघूया गुळाचे कमालीचे फायदे.

रोज गुळ खाल्ल्याने होणारे फायदे

रोज गुळ खाल्ल्याने पचन क्रिया सुरळीत राहते , तसेच तुमच्या पोटात कधीच गॅस होणार नाही.

रोज गुळाचे सेवन केल्याने त्वचेला तेज येते आणि चेहऱ्यावरील पुरळ सुद्धा कमी होऊ लागतात.

सर्दी, खोकला येत असेल तर गुळाचा लाडू बनवून किंवा चहा मध्ये गुळ टाकून पिल्याने आराम मिळतो.

गुळ खाल्ल्याने तुम्हाला थकवा कधीच नाही जाणवणार. आणि शरीरात नेहमी ऊर्जा राहील.

गुळात कुठल्याही ऍलर्जी विरुद्ध लढणारी तत्व असतात. दम्याच्या पेशंटला गुळाचा खूप फायदा होतो.

गुळाला आल्या सोबत गरम करून खाल्ल्याने गळ्याचे आजार दूर होतात.

गरम दुधाबरोबर गूळ खायचे फायदे !

गरम दुधाबरोबर गूळ खाणं तब्येतीसाठी चांगलं आहे. हे दोन्ही एकाच वेळी खाल्ल्यामुळे मोठ्यातला मोठा आजारही बरा होऊ शकतो.

रोज दुध प्यायल्याचे फायदे तसे सगळ्यांनाच माहिती आहेत, पण गरम दुधाबरोबर गूळ खाल्ल्यामुळे वजन कंट्रोलमध्ये राहतं, तसंच त्वचेला निखार येतो. दुधामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि डी तसंच कॅल्शियम, प्रोटीन आणि लॅक्टिक ऍसिड असतं. तर गुळामध्ये सुक्रोज, ग्लुकोज, कॅल्शियम, फॉस्फरस, लोखंड असतं.

शरीरातलं अशुद्ध रक्त साफ होतं..
गुळामध्ये असलेल्या गुणांमुळे शरिरातील अशुद्ध रक्त शुद्ध होतं. त्यामुळे गरम दुध आणि गुळ खाल्ल्यामुळे तुम्ही आजारांपासून दूर राहू शकता.

लठ्ठपणा नियंत्रणात..
गरम दुधामध्ये साखर घालण्याऐवजी गूळ घातला तर लठ्ठपणा नियंत्रणामध्ये राहायला मदत होते.

पोटाचे विकार होतात दूर..
गरम दुध आणि गुळाचं सेवन केल्यामुळे पोटाचे आणि पचनाचे विकार दुर होतात.

सांधेदुखी वर उपाय..
गूळ खाल्ल्यामुळे सांधेदुखीला आराम मिळतो. रोज गूळ आणि आल्याचा तुकडा एकत्र करुन खाल्ला तर सांधे मजबूत होतात.

त्वचा होते मुलायम..
गरम दुध आणि गूळ खाल्ल्यामुळे त्वचा मुलायम होते. एवढच नाही तर यामुळे केसही मजबूत होतात.

थकवा होतो कमी..
कामाच्या ताणामुळे तुम्ही जास्त थकले असाल तर गरम दुध आणि गूळ खा. यामुळे लगेच आराम मिळतो. रोज 3 चमचे गूळ खाल्ल्यानं थकवा दूर होतो.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *