ताज्या बातम्या

महिलेचे दिरासोबत प्रेम प्रकरण सुरू झालं, दोघेही घरातून पळून गेले अन..

भागलपूर जिल्ह्यामध्ये एक महिला आपल्या दिरासोबत पळून गेली आहे. महिलेचे 6 वर्षांपूर्वी लग्न झालं आणि तिला तीन मुलंही आहेत. महिलेच्या नवऱ्याचा एक अपघात झाला आणि त्यानंतर पत्नीचं वागणं बदलू लागलं.

महिलेचा पती कुद्रतुल्लाह याने दिलेल्या माहितीनुसार, 6 वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं, लग्नाच्या तीन वर्षांपर्यंत आयुष्य आनंदात जात होते. 2021 मध्ये आंब्याच्या झाडावरून पडल्याने त्यांचे दोन्ही पाय मोडले होते. आर्थिक अडचणींमुळे योग्य उपचार होऊ शकले नाहीत. नीट उपचार न मिळाल्याने काही दिवसांनी चालायला त्रास होऊ लागला. घरची आर्थिक परिस्थितीही बिकट होत चालली होती.

दरम्यान, या काळात पत्नी आणि भावामध्ये जवळीक वाढली आणि त्यांचं प्रेम प्रकरण सुरू झालं. 29 मे रोजी दोघेही घरातून पळून गेले. याप्रकरणी सानोखर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हे संपूर्ण प्रकरण भागलपूर जिल्ह्यातील सनहौला ब्लॉकचे सांगितले जात आहे. महिलेच्या पतीने सांगितले की, गोड्डा जिल्ह्यातील (झारखंड) येथील रहिवासी असलेल्या मुलीसोबत 6 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं

पाय मोडल्यानंतरच पत्नीचं वागण बदललं होतं. भावासोबत पळून गेल्यानंतर ही महिला प्रियकरासह तिच्या माहेरी पोहोचली. माहेरी पोहोचल्यानंतर दोघांना तिथे लग्न करायचं होतं, याला गावकऱ्यांनी विरोध केला. त्यानंतर दोघेही तेथून पळून गेले. पोलीस दोघांचा शोध घेत आहेत. एका वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button